अभिषेक बच्चनसोबत अफेअरच्या चर्चांदरम्यान निम्रत कौरने जाहीर केलं तिचं रिलेशनशिप स्टेटस

अभिषेक बच्चनसोबत अफेअरच्या चर्चांदरम्यान निम्रत कौरने जाहीर केलं तिचं रिलेशनशिप स्टेटस

अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या अफेअरच्या चर्चांदरम्यान अभिनेत्री निम्रत कौरची चर्चा होऊ लागली. अभिषेक आणि निम्रतने ‘दसवी’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं आणि तेव्हापासूनच या दोघांमध्ये अफेअर सुरू झाल्याच्या चर्चांना उधाण आलं. यावर अद्याप अभिषेक किंवा निम्रतने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. मात्र आता निम्रतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये तिने अप्रत्यक्षपणे स्वत:च्या रिलेशनशिप स्टेटसचा खुलासा केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून अभिषेक आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या जोरदार चर्चा आहेत. अशातच अभिषेकने ऐश्वर्याची फसवणूक केली असून त्याचं निम्रत कौरशी विवाहबाह्य संबंध असल्याचं म्हटलं गेलं.

निम्रत ही ‘सिटाडेल हनी बनी’ या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला पोहोचली होती. यानिमित्त ‘झूम’ वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिने अप्रत्यक्षपणे स्वत: सिंगल असल्याचं सांगितलं आहे. निम्रतला या मुलाखतीत विचारलं गेलं की, ती सिंगल आहे आणि नेहमी फिरायला जात असते. तर इतर सिंगल मुलींना ती काय सल्ला देईल? यानंतर निम्रत उत्तर देऊ लागते तेव्हाच हा व्हिडीओ संपतो. निम्रत इतर सिंगल मुलींना ट्रॅव्हलविषयी सल्ला देत असते, यावरूनच ती स्वत:ही सिंगल आहे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

एकीकडे अभिषेकवर फसवणुकीचा आरोप केला जात असताना अभिनेत्री सिमी गरेवाल यांच्या मदतीला धावून आल्या आहेत. त्यांनी सोशल मीडियावर अभिषेकच्या एका मुलाखतीचा व्हिडीओ शेअर करत तो इंडस्ट्रीतील सर्वांत चांगला माणूस असल्याचं म्हटलंय. या व्हिडीओत अभिषेक नात्यात प्रामाणिक राहण्याबद्दल बोलताना दिसत आहे. अभिषेकने सिमी गरेवाल यांच्या टॉक शोमध्ये हजेरी लावली होती. याच मुलाखतीचा व्हिडीओ शेअर करत सिमी यांनी लिहिलं, ‘माझ्या मते जे लोक अभिषेकला जवळून ओळखतात ते माझ्या या मताशी सहमत असतील की तो बॉलिवूडमधील सर्वांत चांगला माणूस आहे. त्याच्यात चांगली मूल्ये आणि जन्मजात शालीनता आहे.’

सिमी गरेवाल यांची ही पोस्ट क्षणार्धात सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. या व्हिडीओवर दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर फराह खान म्हणाली, “मी पूर्णपणे सहमत आहे, तो सर्वांत चांगला माणूस आहे.” मात्र या पोस्टवरील इतर कमेंट्स आणि नकारात्मकता पाहून सिमीने नंतर तो व्हिडीओ डिलीट केला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;