भिवंडी ग्रामीण अभेद्यच.. शिवसेनेचाच विजय होणार ! शिवसैनिकांचा वज्रनिर्धार

भिवंडी ग्रामीण अभेद्यच.. शिवसेनेचाच विजय होणार ! शिवसैनिकांचा वज्रनिर्धार

कोणी कितीही बंडखोरी केली तरी भिवंडी ग्रामीणचा शिवसेनेचा गड अभेद्यच आहे आणि विजयही शिवसेनेचाच होईल, असा वज्रनिर्धार शिवसैनिकांनी केला आहे. भिवंडी ग्रामीणमध्ये विजयाची मशाल पेटवून हा विजय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेट देऊ, असा विश्वास ठाणे ग्रामीण थळे यांनी व्यक्त केला.

भिवंडी ग्रामीणमधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे महादेव घाटाळ हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. घाटाळ यांना भिवंडी व वाडा तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने मिंधे गटाचे उमेदवार शांताराम मोरे यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. दरम्यान, काही जणांनी पक्षविरोधी कारवाया करत विरोधकांना मदत करण्याचा प्रयत्न केल्याने त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी केली आहे. मात्र या गद्दारांमुळे कोणताही फरक पडणार नसून भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा अभेद्य गड असून येथे घाटाळ यांचाच विजय होईल, असा विश्वास थळे यांनी व्यक्त केला.

आम्ही कडवट शिवसैनिक.. गद्दारांना धडा शिकवू !

सत्ता आणि पैशांच्या जोरावर कोणी कितीही प्रयत्न केले तरी आम्ही कडवट शिवसैनिक गद्दारांना विधानसभा निवडणुकीत धडा शिकवू. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची अंबाडी येथे जाहीर सभा होणार असल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला असल्याचेही विश्वास थळे यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;