कर्जतमध्ये लाडक्या बहिणींच्या हाती शिवबंधन, नांदगाव, खांडस, फातिमानगरमध्ये इनकमिंग

कर्जतमध्ये लाडक्या बहिणींच्या हाती शिवबंधन, नांदगाव, खांडस, फातिमानगरमध्ये इनकमिंग

कर्जतमध्ये असंख्य महिलांसह तरुणांनी हाती शिवबंधन बांधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेश कार्यक्रमाला कर्जतमधील नांदगाव, खांडस व फातिमानगरमधील शकडो बंधू- भगिनींनी यंदा विधानसभा निवडणुकीत महायुतीला धूळ चारून महाविकास आघाडीचा झेंडा रोवण्याचा निर्धार केला. कर्जतमधील शिवसेना मध्यवर्ती शिवालय येथे हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख व महाविकास आघाडीचे उमेदवार नितीन सावंत यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. यावेळी माजी तालुकाप्रमुख राजाराम महाराज शेळके, रामदास ठोंबरे, माधव कोळंबे, गजानन जाधव, तालुकाप्रमुख उत्तम कोळंबे, भीमसेन बडेकर, राजाराम शेळके, पंढरीनाथ राऊत, माधव कोळंबे, संतोष घाडगे, मुकेश पाटील, कृष्णा जाधव, संपत हाडप, प्रमोद खराडे, प्रशांत दिघे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कर्जतमधील नांदगाव ग्रामपंचायतीतील मोहोपाडा येथील विश्वास बडेकर, समीर जोशी, सुदाम जोशी, सागर जोशी, कृष्णा कारोटे, दीपक शिंदे व पिंचवाडी येथील विजय ठोंबरे, पवन ठोंबरे, प्रतीक ठोंबरे, उदय ठोंबरे, अमर ठोंबरे, चंदन ठोंबरे, महेश ठोंबरे, रोहन हिंदोला, रोहित हिंदोला, उत्तम खंडवी, पंकज ठोंबरे यांनी जाहीर प्रवेश केला, तर खांडस ग्रामपंचायत हद्दीतील पादिरवाडीमधील शिवा पादिर, विलास पादिर, देवजी खंडवी, गजानन खंडवी, काळूराम खंडवी, नितीन पादिर, विशाल पादिर, मंगल हिंदोला, रवींद्र हिंदोला, सुरेश भगत, भरत गावंडा यांच्यासह शेकडो तरुणांनी हाती शिवबंधन बांधले.

पक्षप्रवेश कार्यक्रमात क्रांतीनगर-फातिमानगर येथील सायली पाटील, मनीषा लिये, आशा शिंदे, ज्योती शिंदे, जिजाई शेख, शमा शेख, वंदना इंगळे, कविता कानाडे, शेवंता ठाकूर, प्रिया कानाडे, जिन्त रहीस, सलोनी शिंदे, सुरेखा राऊत, सुगंधी सोनवणे, सुमन माने, बेबी ठाकूर, मोनाली कानाडे, आशा चौरे, शिल्पा मेलकर, मीना बागुल यांच्यासह असंख्य महिलांनी पक्षप्रवेश केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;