फूट पाडणारे अन् कापणारेही तुम्हीच… योगींच्या ‘बटेंगे ते कटेंगे’ विधानावर खरगेंचे सणसणीत प्रत्युत्तर

फूट पाडणारे अन् कापणारेही तुम्हीच… योगींच्या ‘बटेंगे ते कटेंगे’ विधानावर खरगेंचे सणसणीत प्रत्युत्तर

महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये विधानसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. आता प्रचारादरम्यान आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ असे विधान करत काँग्रेसवर टीका केली होती. या विधानाला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मंगळवारी सणसणीत प्रत्युत्तर दिले. ‘समाजात द्वेष पसरवत फूट पाडणारेही तुम्हीच आहात, तसेच फूट पडल्यावर स्वतःच्या स्वार्थासाठी कापणारेही तुम्हीच आहात,’ अशा शब्दांत खरगे यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर पलटवार केला. रांची येथील एका सभेत ते बोलत होते. योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधताना खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावरही हल्लाबोल केला.

समाजात द्वेष पसरवत फूट पाडणारे, फोडणारे आणि कापणारेही हेच आहेत. समाजात फूट पाडणे हाच भाजप- आरएसएसचा अजेंडा आहे, जोपर्यंत त्यांचा अजेंडा मोडत नाही तोपर्यंत ते तुमचे शोषण करत राहतील. त्यामुळे त्यांचा अजेंडा मोडून काढण्याची गरज आहे. तसेच मोदी-शहा यांचे भाषण फक्त जुमला हे लक्षात घ्या. त्यांना समाजात फूट पाडत, भांडणे लावत, दंगली घडवत सत्ता मिळवायची आहे, असा हल्लाबोल मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;