लॉरेन्स बिष्णोईच्या नावाने सलमान खानला पुन्हा धमकी; आठवड्यात पाच धमकीचे संदेश

लॉरेन्स बिष्णोईच्या नावाने सलमान खानला पुन्हा धमकी; आठवड्यात पाच धमकीचे संदेश

अलीकडे धमक्या देण्याचे सत्र मोठय़ा प्रमाणात वाढले आहे. विमानात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा पह्न तर सर्रास केला जातोय. त्याचबरोबर मुंबई  वाहतूक पोलिसांचा नियंत्रण कक्षदेखील धमकी देणाऱयांसाठी सॉफ्ट कॉर्नर बनला आहे. अभिनेता सलमान खानला पुन्हा धमकी देण्यात आली आहे. वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला ही धमकी आली आहे. कुख्यात लॉरेन्स बिष्णोईचा उल्लेख धमकीत करण्यात आला असून याबाबत वरळी पोलीस तपास करत आहेत. आठवडाभरात धमकीचा हा पाचवा संदेश आला आहे.

वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला सोमवारी रात्री व्हॉट्सअॅपद्वारे धमकीचा सलमान खानच्या नावे धमकीचा संदेश आला असून त्यात लॉरेन्स बिष्णोईच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. मी लॉरेन्सचा भाऊ बोलत आहे, सलमानला जर जिवंत राहायचे असेल तर त्याला आमच्या मंदिरात जाऊन माफी मागावी लागेल, पाच कोटी रुपये द्यावे लागतील, तसे न केल्यास सलमानला जिवंत सोडणार नाही. आमची टोळी आजही सक्रिय आहे, असेही संदेशात धमकवण्यात आले आहे.  यापूर्वीदेखील सलमानला मारण्याची धमकी देण्यात आली आहे. वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर गेल्या मंगळवारी संदेश प्राप्त झाला होता व आरोपीने दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती.  वरळी पोलिसांनी धमकी देणाऱया व्यक्तीचा शोध घेऊन त्याला वांद्रे पश्चिमेकडील जामा मस्जिदीजवळून उचलला. आजम मोहम्मद मुस्तफा असे त्याचे नाव होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;