रोहितने आता निवृत्ती घेतली पाहिजे…, टीम इंडियाच्या ‘या’ माजी खेळाडूने केले मोठे वक्तव्य

रोहितने आता निवृत्ती घेतली पाहिजे…, टीम इंडियाच्या ‘या’ माजी खेळाडूने केले मोठे वक्तव्य

टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये झालेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडच्या संघाने निर्विवाद वर्चस्व गाजवत 3-0 अशा फरकाने ऐतिहासिक मालिका विजय साजरा केला. या मालिकेत कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या खराब कामगिरीचा टीम इंडियाला चांगलाच फटका बसला. त्यांच्या या कामगिरीवर नाराज होत अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशातच टीम इंडियाचे माजी खेळाडू एस श्रीकांत यांनी रोहित शर्मा बाबत मोठे वक्तव्य केले आहे.

न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या तीन सामन्यांमध्ये रोहित शर्माने 6 डावांमध्ये फक्त 91 धावा केल्या. त्यामुळे सर्व सामन्यांमध्ये टीम इंडियाची सुरूवात खराब झाली. त्याचा संघाला चांगलाच फटका बसला. रोहितच्या खराब कामगिरीवर बोट ठेवत एस श्रीकांत यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, “आता सर्वजन विचार करू लागले आहेत की, रोहित शर्मा जर ऑस्ट्रेलियामध्ये चांगली कामगिरी करू शकला नाही, तर बहुतेक कसोटी क्रिकेटमधून तो निवृत्ती घेईल.” असे एस श्रीकांत म्हणाले आहेत.

ते पुढे म्हणाले की, “रोहितने यापूर्वीच टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित फक्त वनडे सामने खेळेल. तसेच आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, रोहितचे आता वय झाले असून तो आता तरुण राहिला नाही.” असे एस श्रीकांत म्हणाले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;