गुंतवणूकदारांचे साडेपाच लाख कोटी बुडाले, शेअर बाजारात दिवाळीनंतर मोठी घसरण

गुंतवणूकदारांचे साडेपाच लाख कोटी बुडाले, शेअर बाजारात दिवाळीनंतर मोठी घसरण

दिवाळीत शेअर ट्रेडिंगच्या मुहूर्तावर गुंतवणूकदारांची चांदी झाली. परंतु दिवाळीच्या सुट्टीनंतर मात्र पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे साडेपाच लाख कोटी बुडाल्याचे समोर आले आहे. आज शेअर बाजार नियमित वेळेत सुरू झाला. मात्र बाजार सुरू होताच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण दिसली. सकाळी 9 वाजून 50 मिनिटांच्या सुमारास सेन्सेक्स 860 अंकांनी घसरून 78,864.57 वर स्थिरावला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 273 अंकांनी घसरून 24,031 वर बंद झाला.

बँकिंग फायनान्स आणि आयटी शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणूक आणि फेडरल रिझर्व्हच्या बैठकीमुळे ही घसरण झाल्याचे सांगितले जात आहे. सेन्सेक्समध्ये 1.8 टक्क्यांची घसरण झाल्यामुळे त्यावर सूचीबद्ध असलेल्या पंपन्यांचे मार्पेट पॅपिटल 5.56 लाख कोटी रुपयांनी कमी झाले.

या कंपन्यांना मोठा फटका

रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्पहसिस, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, सन फार्मा 420 अंकांच्या घसरणीसह खूपच खाली राहिले. एल अँड टी, ऑक्सिस बँक, टीसीएस आणि टाटा मोटर्सचीही मोठय़ा प्रमाणावर घसरण झाली.

अमेरिकेतील निवडणुकीचे पडसाद

अमेरिकेत 5 नोव्हेंबर रोजी अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. डेमोव्रेटिक पक्षाच्या नेत्या आणि विद्यमान उपाध्यक्ष कमला हॅरिस विरुद्ध रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार व अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चुरस आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण असून त्याचेच पडसाद शेअर बाजारावर उमटले आहेत.

मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सच्या 30 शेअर्सपैकी 25 शेअर्स घसरले. केवळ चार शेअर्समध्ये वाढ दिसली, तर एका शेअरची स्थिती जैसे थी आहे.

महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 2.39 टक्क्यांची वाढ झाली, तर सन फार्माच्या शेअर्समध्ये पाच टक्क्यांची घसरण झाली. देशातील सर्वात मोठी पंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्सही 2.64 टक्क्यांनी घसरले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;