कसोटीत पाकिस्तानही हिंदुस्थानला नमवेल, वेगवान गोलंदाज अक्रमचा दावा

कसोटीत पाकिस्तानही हिंदुस्थानला नमवेल, वेगवान गोलंदाज अक्रमचा दावा

न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पराभवाने नुसते हिंदुस्थानी क्रिकेटचे मनोधैर्यच खचलेले नाही तर बलाढ्य हिंदुस्थानी क्रिकेटच्या प्रतिमेलाही तडा बसलाय. या पराभवामुळे आता हिंदुस्थानी संघाला फिरकी खेळपट्टीवर पाकिस्तानी संघही सहज हरवू शकतो, असा दावा चक्क वेगवान गोलंदाज वसीम अक्रमने केला आहे.

काल वानखेडेवर फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करल्यामुळे हिंदुस्थानी संघावर तब्बल 24 वर्षांनंतर क्लीन स्विपची नामुष्की ओढावली. न्यूझीलंडच्या या स्वप्नवत कामगिरीचा साऱयांनाच धक्का बसला आहे. न्यूझीलंडने पुण्यात हिंदुस्थानला पराभूत करताना हिंदुस्थानची मायदेशातील सलग 18 कसोटी मालिका विजयाची मालिका खंडित केली होती. या दारुण पराभवानंतर जगभरातून हिंदुस्थानी संघावर जोरदार टीका होत असून कुणाशीही संघाची तुलना केली जात आहे. एकीकडे हिंदुस्थान अपयशाच्या दरीत कोसळला असताना पाकिस्तानने मात्र इंग्लंडवर स्फूर्तीदायक विजय मिळवत सर्वांनाच चकित केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;