किसन कथोरेंची अजब कथा, न सांगताच गळ्यात भाजपचा गमछा घातला

किसन कथोरेंची अजब कथा, न सांगताच गळ्यात भाजपचा गमछा घातला

सत्ताधारी पक्षाचे आमदार असूनही किसन कथोरे यांना मुरबाडचा विकास करता न आल्याने त्यांच्यावर नेहमीच टीकेची झोड उठते. मात्र आता ऐन विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना त्यांची अजब कथा समोर आली आहे. आमदार साहेब प्रचारासाठी घरासमोर अचानक आल्याने आपली संस्कृती जपत महाविकास आघाडीतील ज्येष्ठ कार्यकर्त्याने त्यांचा पाहुणचार केला. त्यांना घरात बोलवले. मात्र हीच संधी साधत कथोरेंनी चक्क पाहुणचाराला बोलावलेल्या या पदाधिकाऱ्याच्या गळय़ात भाजपचा गमछा घालून फोटो व्हायरल केले. याबाबत महाविकास आघाडीच्या मुरबाडमधील कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत कथोरेंचा हा विश्वासघाती स्वभाव जुनाच असल्याची टीका केली आहे. मुरबाड विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सुभाष पवार रिंगणात उतरले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;