उद्धव ठाकरे यांचा झंझावाती दौरा; अंबामातेचे दर्शन घेऊन कोल्हापुरातून आज प्रचाराचा श्रीगणेशा

उद्धव ठाकरे यांचा झंझावाती दौरा; अंबामातेचे दर्शन घेऊन कोल्हापुरातून आज प्रचाराचा श्रीगणेशा

माघारीची मुदत संपताच राज्यातील लढतींचे चित्र आता स्पष्ट झाले असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या सकाळी 11 वाजता कोल्हापूर येथे अंबामातेचे दर्शन घेऊन झंझावाती प्रचाराचा श्रीगणेशा करणार आहेत. उद्यापासून एक आठवडय़ाचा हा दौरा असणार आहे. दौऱयाच्या पहिल्या दिवशी कोल्हापुरातील राधानगरी आणि त्यानंतर रत्नागिरीत उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे.

पहिल्या टप्प्यात उद्धव ठाकरे राधानगरी, रत्नागिरी, राजापूर, भिवंडी ग्रामीण, दर्यापूर, तिवसा, बडनेरा, बाळापूर, बुलढाणा, मेहकर, परतूर, हिंगोली, कळमनुरी, परभणी, गंगाखेड, सांगोला, सोलापूर दक्षिण या मतदारसंघांचा दौरा करणार आहेत. यानिमित्ताने शिवसैनिकांमध्ये जबरदस्त उत्साह संचारला असून मशालीचे तेज सर्वत्र पाहायला मिळत आहे.

राधानगरी मतदारसंघातील आदमापूर येथे उद्धव ठाकरे यांची सभा होईल.

रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप जलतरण तलाव येथील मैदानावर उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे.

आज

स्थळ  – राधानगरी विधानसभा (आदमापूर)

वेळ – दुपारी 12.30 वाजता

 

स्थळ – रत्नागिरी (रत्नागिरी व राजापूर विधानसभा)

वेळ – सायंकाळी 6 वाजता

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;