गाडी धुण्यासाठी गेलेल्या दोन शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू

गाडी धुण्यासाठी गेलेल्या दोन शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू

एकीकडे सर्वजण दिवाळीचा आनंद साजरा करीत असताना कोपरगाव तालुक्यातील मढी बुद्रुक मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. उम्रावती नदीवर गाडी धुवत असताना पाय सरकून नदीत पडल्याने दोन शेतकऱ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.

उत्तम राहणे (42) व माधव गमे (32) असे मृत शेतकऱ्यांची नावे आहे.मढी येथील उम्रावती नदीवर दोन शेतकरी आपले चारचाकी वाहन धुण्यासाठी गेले होते. उत्तम राहणे हे आपले वाहन धुवत असताना पाय सरकून नदीत पडले. त्यावेळी माधव गमे हे देखील त्याना वाचवण्यासाठी गेले. मात्र तेव्हा पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बेपत्ता झाले. ऐन दिवाळीच्या दिवशी राहणे आणि गमे कुटुंबीयांवर दु:खाचे डोंगर कोसळल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;