Raosaheb Danve: मला अडचणीचे प्रश्न विचारू नका, महायुती निवडून येणार! स्वयंघोषित ‘शिवाजी’ रावसाहेब दानवे यांची लोणकढी थाप

Raosaheb Danve: मला अडचणीचे प्रश्न विचारू नका, महायुती निवडून येणार! स्वयंघोषित ‘शिवाजी’ रावसाहेब दानवे यांची लोणकढी थाप

मी राज्यभर दौरा केला असून सर्वत्र महायुतीचा बोलबाला आहे. महायुतीच निवडून येणार असल्याची जबरदस्त लोणकढी थाप स्वयंघोषित ‘शिवाजी’ रावसाहेब दानवे यांनी मारली. यासंदर्भात मला अडचणीत आणणारे प्रश्न विचारू नका, अशी प्रेमळ दमबाजीही त्यांनी पत्रकारांना केली.

भाजपचे राज्याचे निवडणूक प्रमुख रावसाहेब दानवे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. मी संपूर्ण राज्याचा दौरा केला असून महायुतीला अत्यंत पोषक वातावरण आहे. राज्यातील आमच्या सरकारने अडीच वर्षात फक्त जनतेच्या हिताचीच कामे केली, अशी थापही दानवे यांनी मारली. पत्रकारांनी जीडीपी, उद्योगक्षेत्राची घसरण, ‘मी शिवाजी, तो औरंगजेब’ या विषयावर प्रश्नांची सरबत्ती करताच रावसाहेब दानवे अस्वस्थ झाले. महायुती पुन्हा कशी निवडून येणार हे विस्ताराने सांगा, असे पत्रकारांनी म्हणताच ‘मला अडचणीत आणणारे प्रश्न विचारू नका’ अशी लडिवाळ दमबाजी दानवे यांनी केली.

Maharashtra Politics: ब्रिजभूषण पाझारे उमेदवारीवर ठाम, फोन नॉट रिचेबल; भाजपचे टेन्शन वाढले

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;