‘अनुपमा’ फेम रुपाली गांगुलीवर सावत्र मुलीचे गंभीर आरोप; म्हणाली माझ्या वडिलांना…

‘अनुपमा’ फेम रुपाली गांगुलीवर सावत्र मुलीचे गंभीर आरोप; म्हणाली  माझ्या वडिलांना…

टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय मालिका ‘अनुपमा’ मासिकेतील अनुपमा म्हणजेच अभिनेत्री रुपाली गांगुली तिच्या कार्यक्रमामुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र आता ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. रुपालीच्या सावत्र मुलीनं केलेल्या आरोपांमुळे ती पुन्हा एकदा वादात सापडली आहे. रुपालीची सावत्र मुलगी ईशा वर्माची एक जुनी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ईशाने त्याच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. जुनी पोस्ट व्हायरल झाल्यानंतर ईशानेही एक नवीन पोस्ट शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Esha Verma Viral Post

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये ईशाने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. रुपाली गांगुलीनं तिच्या वडिलांना तिच्याच्यापासून दूर नेलं आहे. एवढेच नाही तर रुपालीनं तिच्या वडिलांना ड्रग्ज देऊन आपल्या ताब्यात घेतल्याचं तिनं आपल्या आरोपात म्हटलं आहे. या पोस्टमध्ये ईशा वर्मानं रिया चक्रवर्तीसारख्या अभिनेत्रीवर गंभीर आरोप केले आहेत. रियानं जसे सुशांत सिंह राजपूतसोबत केलं, तेच तिनं केलं आहे, असं ईशा वर्माचं म्हणणं आहे.

ईशा वर्मा पोस्ट
जुनी पोस्ट व्हायरल झाल्यानंतर ईशाने नवीन पोस्ट शेअर केली. जुनी पोस्ट व्हायरल झाल्यावर तिचे वडील आणि रुपाली हे दावे नाकारू शकतात, परंतु सत्य बाहेर येण्याच्या भीतीमुळे ते दोघेही उत्तर देत नाहीत असा तिला विश्वास आहे. असे तिने या पोस्टमध्टे म्हंटले आहे.

अश्विन के वर्मा पोस्ट

दरम्यान, ईशाच्या दाव्यानंतर तिच्या वडिलांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. रुपाली गांगुलीचे पती अश्विन के वर्मा यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. माझी धाकटी मुलगी तिच्या पालकांच्या घटस्फोटामुळे नाखूष आहे. घटस्फोटाचा मुलांवर खूप वाईट परिणाम होतो. “माझ्या आधीच्या लग्नापासून मला दोन मुली आहेत. रुपाली आणि मी नेहमीच यावर अनेकदा चर्चा केली आहे. मला या सगळ्यांची खूप काळजी आहे.” असे त्यांनी म्हटले आहे.

अश्विनच्या पोस्टवरून रुपाली गांगुली ही त्यांची दुसरी पत्नी असल्याचे स्पष्ट झाले आहेच. रूपाली गांगुली आणि अश्विन वर्मा यांनी 2013 मध्ये लग्न केलं होतं.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;