‘राधा कृष्ण’ फेम अभिनेत्याचा सेटवर अपघात, फोटो पोस्ट करत दिली हेल्थ अपडेट

‘राधा कृष्ण’ फेम अभिनेत्याचा सेटवर अपघात, फोटो पोस्ट करत दिली हेल्थ अपडेट

Sumedh Mudgalkar Health Update: प्रसिद्ध पौराणिक टेलिव्हिजन मालिका ‘राधा कृष्ण’ मधील श्रीकृष्णाच्या भूमिकेने घराघरात लोकप्रिय झालेला अभिनेता सुमेध मुदगलकर याच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सुमेध याचा सेटवर अपघात झाला आहे. अपघात झाल्यानंतर अभिनेत्याने पोस्ट आणि स्वतःचा फोटो पोस्ट करत स्वतःच्या प्रकृतीबद्दल चाहत्यांना माहिती दिली आहे. अभिनेत्याचा फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांनी चिंता व्यक्त केली. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सुमेध याच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

सुमेध याने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये अभिनेत्याच्या चेहऱ्याला पट्टी बांधलेली दिसत आहे. एका प्रोजेक्टच्या ॲक्शन सीनचं शूटिंग सुरु असताना, अभिनेत्याच्या नाकाला दुखापत झाली. ज्यामुळे सुमेध याचं ऑपरेशन देखील करण्यात आलं आहे.

पोस्टमध्ये सुमेध म्हणाला, ‘चिंता करत आहेत त्यांच्यासाठी मझी प्रकृती आता स्थिर आहे. चिंता करण्याचं काहीही कारण नाही. जखम फार मोठी नाही. पूर्ण बरं होण्यासाठी काही आठवडे लागतील. त्यामुळे मला असं वाटतं माझं वर्जन 2.8 ची प्रतीक्षा करावी लागणार आहे. ‘

 

 

‘मला माहित होते की अशा घटनांवर पोस्ट न केल्याने तुमच्या सर्वांमध्ये चिंता निर्माण होऊ शकते. म्हणून मी स्वतः तुम्हाला अपडेट करण्याचा विचार केला. तुझ्या प्रेमाची परतफेड करण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न करेन!” असं देखील सुमेध सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हणाला आहे.

सध्या सोशल मीडियावर सुमेध याची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. कमेंट करत चाहते चिंता व्यक्त करत आहेत. सुमेध याच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता लवकरच मराठी सिनेमात झळकणार आहे. सुमेध याने करियरची सुरुवात ‘डान्स इंडिया डान्स सीझन 4’ पासून केली. त्यानंतर अभिनेत्याने कधीच मागे वळून पाहिलं नाही. ‘राधा कृष्ण’ मालिकेमुळे सुमेध याच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीमध्ये मोठी वाढ झाली.

सुमेध सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असतो. सोशल मीडियावर सुमेध याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सुमेध कायम फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. चाहते देखील अभिनेत्याच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;