Rishi Kapoor: मुलीमुळे ऋषी यांनी स्वतःला संपवलं असतं पण …, नीतू कपूर यांच्याकडून मोठा खुलासा

Rishi Kapoor: मुलीमुळे ऋषी यांनी स्वतःला संपवलं असतं पण …, नीतू कपूर यांच्याकडून मोठा खुलासा

Rishi Kapoor: अभिनेते ऋषी कपूर यांनी अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली. आज ऋषी कपूर आपल्यात नसले तरी त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याच्या चर्चा चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात. आता ऋषी कपूर लेक रिद्धीमा कपूर साहनी हिच्यामुळे चर्चेत आले आहे. रिद्धीमा सध्या ‘बॉलिवूड वाईव्स वर्सेज फॅब्यूलस लाईफ’ शोमध्ये दमदार भूमिका बजावताना दिसत आहे. सांगायचं झालं तर, रिद्धीमा ज्वेलरी डिझायनर आहे. पण रिद्धीमा हिचं पहिल्यापासून अभिनेत्री होण्याचं स्वप्न होतं? यावर ऋषी कपूर यांच्या बायोग्राफीमध्ये नीतू कपूर यांनी मोठा खुलासा केला आहे.

नीतू कपूर म्हणाल्या होत्या, ‘रिद्धीमाने कधी अभिनेत्री होण्याचं इच्छा व्यक्त केल्यानंतर ऋषी कपूर नाराज व्हायचे.. रिद्धीमाने कधी अभिनेत्री होण्याची इच्छा व्यक्त केली तर, तिचे वडील स्वतःचं आयुष्य संपवतील… या भीतीमध्ये रिद्धीमा हिचं बालपण गेलं…’

 

 

‘रिद्धीमा हिच्यामध्ये अभिनेत्री होण्यासारखे पूर्ण गुण आहेत. पण तिने कधीच स्वतःचे स्वप्न सांगितले नाही. कारण तिला माहिती होतं की तिच्या वडिलांना आवडणार नाही. रिद्धीमा हुशार आणि सुंदर मुलगी आहे. बॉलिवूडच्या अभिनेत्रींना ती टक्कर देऊ शकली असती. पण रिद्धीमाने तिच्या वडिलांसाठी असं केलं नाही.’

‘अभिनयाशिवाय रिद्धीमा हिने कपडे आणि ज्वेलरी डिझायनिंमध्ये करियर करण्याचं ठरवलं आणि ऋषी यांने देखील मुलीला आनंदाने शिक्षणासाठी लंडन याठिकाणी पाठवलं…’, रिद्धीमा बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

रिद्धीमा हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, रिद्धीमा एक प्रसिद्ध ज्वलरी डिझायनर आहे. रिद्धीमा हिचं लग्न उद्योगपती भरत सहानी यांच्यासोबत झालं आहे. दोघांना एक मुलगी देखील आहे. रिद्धीमा अभिनेत्री नसली तरी, सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

 

 

रिद्धीमा देखील चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. रिद्धीमा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. रिद्धीमा प्रचंड फिटनेस फ्रिक आहे. ती कायम योगा किंवा वर्कआऊट करताना स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;