Tabu: ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यामुळे तब्बू आजही एकटीच, वयाच्या 52 व्या वर्षीही अविवाहित

Tabu: ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यामुळे तब्बू आजही एकटीच, वयाच्या 52 व्या वर्षीही अविवाहित

Tabu Love Life: अभिनेत्री तब्बू हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आज तब्बू पूर्वी प्रमाणे मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी, खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. तब्बू हिच्याबद्दल अशा काही गोष्टी आहे आहेत, ज्या फार कमी लोकांना माहिती आहेत. तब्बू हिने वयाच्या 14 व्या बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. देव आनंद यांच्या ‘नैजवान’ सिनेमातून अभिनेत्री प्रवास सुरु झाला. त्यानंतर अभिनेत्रीने कधीच मागे वळून पाहिलं नाही. प्रोफेशनल आयुष्यात तब्बू यशाच्या उच्च शिखरावर पोहोचली. पण खासगी आयुष्यात मात्र अभिनेत्रीला अनेक संकटांचा सामना करावा लागला. तब्बू आजही अविवाहित आहे. पैसा, संपत्ती, आणि प्रसिद्ध सर्वकाही असूनही अभिनेत्री तब्बू आजही एकटीच जगते.

एका मुलाखतीत खुद्द तब्बू हिने स्वतःच्या लग्नाबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्यामुळे तब्बू एकटीच आहे. तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नाही तर, अजय देवगन आहे. ‘माझा भाऊ समीर आर्या आणि अजय देवगन माझ्या शेजारी राहायचे. दोघांची माझ्यावर करडी नजर असायची… जर कोणता मुलगा माझ्या बाजूला जरी दिसला तरी दोघे त्याला धमकवायचे मारयचे… याच कारणामुळे मी आजही सिंगल आहे.’

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Tabu (@tabutiful)

 

‘मी अजयला नेहमी म्हणायचे माझ्यासाठी एक मुलगा शोध. पण त्याने कधीच लग्नासाठी मुलगा शोधला नाही…’, सांगायचं झालं तर, अजय आणि तब्बू चांगले मित्र आहेत. पण एक काळ असा देखील होता जेव्हा दोघांच्या नात्याची चर्चा रंगली होती. अशात अजय याने अभिनेत्री काजोल हिच्यासोबत संसार थाटला. काजोल आणि अजय यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

नागार्जुन आणि तब्बू यांचं अफेअर…

अक्किनेनी नागार्जुन यांच्यासोबत अभिनेत्रीचं फार घट्ट होतं. अनेक वर्ष दोघांनी एकमेकांना डेट देखील केलं. नागार्जुन आणि तब्बू एक दोन नाहीतर, चक्क दहा वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. पण तेव्हा नागार्जुन विवाहित होते आणि पत्नीला घटस्फोट देण्यासाठी तयार नव्हते.

नागार्जुन याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर तब्बू हिच्या आयुष्यात कधी कोणाची एन्ट्री झाली नाही. त्यामुळे अभिनेत्रीने कधी लग्न करण्याचा देखील विचार केला नाही. म्हणून जर नागार्जुन आणि तब्बू यांचं ब्रेकअप झालं नसतं तर, अभिनेत्री आज विवाहित असती.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;