थोडी तरी लाज बाळग…, ‘ॲनिमल’ सिनेमातील तृप्ती – रणबीर यांचे बोल्ड सीन, सुनील ग्रोव्हर म्हणाला…

थोडी तरी लाज बाळग…, ‘ॲनिमल’ सिनेमातील तृप्ती – रणबीर यांचे बोल्ड सीन, सुनील ग्रोव्हर म्हणाला…

Triptii Dimri Bold scene with Ranbir Kapoor: अभिनेता कार्तिक आर्यन स्टारर ‘भुल भुलैय्या 3’ सिनेमामुळे अभिनेत्री तृप्ती डिमरी प्रसिद्धी झोतात आली आहे. सिनेमाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहेत.बॉक्स ऑफिसवर सिनेमाची तगडी कमाई होत असताना तृप्ती, कार्तिक, विद्या बालन आणि सिनेमाचे दिग्दर्शक ‘द ग्रे इंडियन कपिल शो’मध्ये पोहोचले. शोमध्ये तृप्ती हिला विनोदवीर सुनील ग्रोव्हर याने ‘ॲनिमल’ सिनेमातील इंटिमेट सीनबद्दल प्रश्न विचारले. यावर चाहत्यांनी सुनील याच्यावर निशाणा साधला आहे. तृप्ती हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री ‘ॲनिमल’ सिनेमामुळे प्रसिद्धी झोतात आली.

शोमध्ये ढपलीच्या भूमिके सुनील, तृप्ती हिला ‘ॲनिमल’ सिनेमात अभिनेता रणबीर कपूर याच्यासोबत दिलेल्या इंटिमेट सीनबद्दल विचारते. सुनील तृप्तीला विचारतो. ‘ॲनिमल सिनेमात तूच होतीस ना?’ यावर तृप्ती म्हणते, ‘हो मीच आहे ती…’, पुढे सुनील म्हणतो, ‘सिनेमात रणबीर कपूरसोबत तू जे काही केलं आहेस, ते फक्त सिनेमासाठी मर्यादित होतं.. अशी मी आशा करते. खऱ्या आयुष्यात तर असं काही नव्हतं ना? यावर तृप्ती हसते आणि म्हणते, ‘नाही असं काहीही नाही… त्यामधील काहीह सत्य नव्हतं…’

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Triptii Dimri (@tripti_dimri)

 

सुनील ग्रोव्हर याने तृप्तीला विचारलेल्या प्रश्नानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. रेडिटवर सध्या नेटकऱ्यांनी सुनील ग्रोव्हर याच्यावर निशाणा साधला आहे. एक नेटकरी म्हणाला, ‘काय विचित्र प्रश्न आहे….’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘रणबीर कपूर याला असा प्रश्न विचारशील का? रणबीरला सीनबद्दल का नाही विचारलं…’ असा प्रश्न देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून नेटकरी विचारत आहेत.

‘ॲनिमल’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमात अभिनेता रणबीर कपूर, अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि तृप्ती डिमरी महत्त्वाच्या भूमिकेत होत्या. सिनेमानंतर ‘भाभी 2’ म्हणून तृप्ती तुफान चर्चेत आली. सिनेमात तृप्ती आणि रणबीर यांचे काही बोल्ड सीन होते. ज्यामुळे तृप्ती हिची चर्चा रंगली. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर देखील अफाट कमाई केली.

तृप्ती हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, सोशल मीडियावर अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे. सोशल मीडियावर तृप्ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;