माझ्या वडिलांसोबत रुपाली गांगुलीचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर; सावत्र मुलीचा ‘अनुपमा’वर धक्कादायक आरोप

माझ्या वडिलांसोबत रुपाली गांगुलीचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर; सावत्र मुलीचा ‘अनुपमा’वर धक्कादायक आरोप

अभिनेत्री रुपाली गांगुली ‘अनुपमा’ या मालिकेमुळे सतत चर्चेत असते. टेलिव्हिजनवरील ही सर्वांत लोकप्रिय मालिका असून या मालिकेला चांगला टीआरपी मिळतो. मात्र रुपाली अनेकदा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत येते. रुपालीला अनेकदा तिचा पती अश्विन के. वर्मासोबत पाहिलं गेलंय. इंडस्ट्रीत लोक त्यांच्या परफेक्ट लग्नाचं कौतुक करतात. मात्र रुपालीवर तिच्या सावत्र मुलीने धक्कादायक आरोप केले होते. रुपालीच्या आधी अश्विन के. वर्माचं सपना वर्माशी लग्न झालं होतं आणि त्यांना दोन मुली आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार अश्विनची मुलगी ईशा वर्माने सोशल मीडियावर पोस्ट लिहित रुपालीवर कुटुंब उद्ध्वस्त करण्याचा आरोप केला होता.

ईशा वर्माची पोस्ट पुन्हा चर्चेत

‘रेडिट’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ईशा वर्माची जुनी पोस्ट पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. ईशा ही अश्विन आणि त्याच्या पहिल्या पत्नीची मुलगी आहे. ईशाने चार वर्षांपूर्वीच्या या स्क्रीनशॉटमध्ये रुपाली आणि अश्विनच्या लग्नाबाबत खुलासा केला होता. तिने रुपालीवर विवाहबाह्य संबंधाचे आरोप केले होते. ईशाने असंही म्हटलं होतं की रुपालीने तिच्या वडिलांना त्यांच्यापासून वेगळं केलंय आणि आता ते एकमेकांशी बोलत नाहीत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Esha Verma (@eshav.official)

काय होती ईशाची पोस्ट?

‘हे खूपच दु:खद आहे. कोणाला रुपाली गांगुलीची खरी कहाणी माहीत आहे का? तिचं 12 वर्षांपर्यंत अश्विन के. वर्मासोबत अफेअर होतं. तेव्हा ती विवाहित होती. ती एक कठोर मनाची महिला आहे आणि तिने मला, माझ्या बहिणीला आमच्या वडिलांपासून दूर केलंय. ते मुंबईत येण्याआधी 13-14 वर्षे न्यूजर्सी आणि कॅलिफोर्नियाला राहायचे. मी हे सगळं यासाठी बोलतेय की कारण ती नेहमी असा दावा करते की तिचं वैवाहिक आयुष्य किती सुंदर आहे. पण खऱ्या आयुष्यात ती वेगळीच आहे. मी जेव्हा कधी माझ्या वडिलांना फोन करायची, तेव्हा ती ओरडायची. इतकंच नव्हे तर तिने मला आणि माझ्या आईला धमक्यासुद्धा दिल्या आहेत’, अशी पोस्ट ईशाने लिहिली होती.

2021 मध्ये ईशा वर्माला तिची सावत्र आई रुपाली गांगुली आणि वडील अश्विन वर्मा यांच्यासोबत एकाच फ्रेममध्ये पाहिलं गेलं होतं. या तिघांनी एकत्र फोटोसाठी पोझ दिला होता. रुपालीने इन्स्टाग्रामवरील या फोटोला लाइकसुद्धा केलं होतं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;