राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर केंद्रातलं सरकार कोसळणार, जितेंद्र आव्हाड यांचा दावा

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर केंद्रातलं सरकार कोसळणार, जितेंद्र आव्हाड यांचा दावा

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर केंद्रातलं मोदी सरकार कोसळणार असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. ते मुंब्र्यात बोलत होते.

मुंब्रा येथे एका सभेला संबोधित करताना आव्हाड म्हणाले की 23 तारखेला राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होईल. त्यानंतर किमान दोन महिन्यात नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांनी भाजपला दिलेला पाठिंबा काढून घेतील आणि मोदींचं सरकार कोसळेला असा अंदाज आव्हाड यांनी व्यक्त केला आहे.

अजित पवार गट पाकिटमार

मुंब्र्यात झालेल्या एका सभेत जितेंद्र आव्हाड म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष शरद पवार यांचा होता. अजित पवार यांनी शरद पवार यांना धक्के मारून पक्षातून बाहेर काढलं. पक्षाचे चिन्हही काढून घेतले. अजित पवार गट हा पाकिटमारांची टोळी आहे अशी टीका आव्हाड यांनी केली.

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;