Love Life | वयाच्या 52 व्या वर्षी 26 वर्ष लहान तरुणीसोबत लग्न, बायकोसोबत ‘त्या’ फोटोंमुळे अभिनेता ट्रोल

Love Life | वयाच्या 52 व्या वर्षी 26 वर्ष लहान तरुणीसोबत लग्न, बायकोसोबत ‘त्या’ फोटोंमुळे अभिनेता ट्रोल

झगमगत्या विश्वात कायम सेलिब्रिटींच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याच्या चर्चा रंगलेल्या असतात. पण आपल्या आवडत्या सेलिब्रिटीच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. सांगायचं झालं तर, झगमगत्या विश्वात अनेक सेलिब्रिटी असे देखील आहेत, ज्यांनी प्रेमासाठी सर्व मर्यादा ओलांडल्या. ज्यामुळे त्यांनी टीकेचा सामना देखील करावा लागला. पण सेलिब्रिटींनी कोणत्याच गोष्टीला अधिक महत्त्व न देता फक्त आणि फक्त स्वतःच्या भावनांना अधिक महत्त्व दिलं. असाच एक अभिनेता आणि मॉडेल म्हणजे मिलिंद सोमण… वयाच्या 52 व्या वर्षी मिलिंद सोमण यांनी 25 वर्ष लहान तरुणीसोबत लग्न केलं. ज्यामुळे अभिनेत्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. शिवाय न्यूड फोटोंमुळे देखील अभिनेता वादाच्या भोवऱ्यात अडकला होता.

26 वर्ष लहान तरुणीसोबत लग्न

2018 मध्ये मिलिंद सोमण याने 26 वर्षीय लहान तरुणीसोबत लग्न केलं. मिलिंद सोमण याच्या बायकोचं नाव अंकिता कोंवर (Ankita Konwar) असं आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे अंकिता हिची आई देखील मिलिंद सोमण याच्यापेक्षा लहान आहे. याच कारणामुळे मिलिंद याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. एवढंच नाही तर, मिलिंद कायम बायकोसोबत रोमँटिक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. ज्यामुळे त्याला कायम ट्रोल केलं जातं.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Milind Usha Soman (@milindrunning)

 

कमेंटच्या माध्यमातून नेटकरी मिलिंद याच्यावर निशाणा साधतात. सोशल मीडियावर मिलिंद कायम सक्रिय असतो. मिलिंद आणि अंकिता यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मिलिंद प्रमाणे अंकिता देखील फिटनेस फ्रिक आहे.

मिलिंद सोमण आणि वादग्रस्त प्रकरण…

1995 मध्ये अभिनेता आणि सुपरमॉडेल मिलिंद सोमणच्या न्यूड फोटोशूटचा वाद अजूनही चर्चेत आहे, ज्यामुळे मिलिंदला 14 वर्षे कायदेशीर लढा द्यावा लागला होता. मिलिंद सोमण याच्यावर जाहिरातीद्वारे अश्लीलता पसरवल्याचा आरोप तर होताच पण वन्यजीव संरक्षण अंतर्गत न्यायालयात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. ज्यामुळे अभिनेता वादाच्या भोवऱ्यात अडकला होता.

2020 मध्ये देखील अभिनेता वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. 2020 मध्ये अभिनेता गोव्याच्या एका समुद्र किनारी न्यूड पळताना दिसला होता. मिलिंदचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. यावर मिलिंद याने प्रतिक्रिया देखील दिली होती.

‘एक न्यूड व्यक्ती काय आहे. आपल्याला देवाने असंच बनवलं आहे. इन्स्टाग्रामवर अनेक न्यूड फोटो आहेत. प्रत्येकाचे वेगळे स्वप्न असतात…’ असं मिलिंद म्हणाला होता. आज मिलिंद सोमण याचा वाढदिवस असल्यामुळे सर्वत्र त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याची चर्चा रंगली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;