बंदी घातलेल्या प्लॅस्टिकवरील कारवाई ठप्प, आता निवडणुकीनंतरच वेग घेणार

बंदी घातलेल्या प्लॅस्टिकवरील कारवाई ठप्प, आता निवडणुकीनंतरच वेग घेणार

मुंबईत गेल्या काही महिन्यांपासून थंडावलेली प्रतिबंधित प्लॅस्टिकवरील कारवाई आता अक्षरशः ठप्प पडली आहे. पालिकेकडून कारवाईचे काम करणाऱ्या टीम निवडणुकीच्या कामाला गेल्यामुळे कारवाईवर परिणाम झाल्याचे बोलले जात आहे. मात्र आता निवडणुकीनंतरच ही कारवाई होईल, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. ही कारवाई प्रथम पालिकेच्या मंडया व त्यानंतर मार्केटध्ये ही कारवाई करण्यात येणार आहे.

मुंबईत 26 जुलै 2005 रोजी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण होऊन मोठे नुकसान झाले होते. या महापुराला प्लॅस्टिक पिशव्या कारणीभूत ठरल्याचे समोर आले. त्यानंतर 2018 मध्ये  50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात आली. नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरू करण्यात आली. मात्र कोरोनामुळे ही कारवाई थंडावली होती. कोरोना आटोक्यात आल्यानंतर 1 जुलै 2022 पासून पालिकेने कारवाईचा वेग वाढवला. त्यानंतर काही महिने पालिकेने बाजारात, मॉल, उपाहारगृहे आदी ठिकाणी प्लॅस्टिकवर कारवाईचा बडगा उगारला. त्यानंतर मात्र कारवाई पुन्हा थंडावली. त्यामुळे सध्या बाजारात प्लास्टिकचा सर्रास वापर होताना दिसत आहे.

या प्लॅस्टिकवर बंदी

  • सर्व प्रकारच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या (कॅरी बॅग) हॅण्डल असलेल्या व नसलेल्या (सर्व जाडीच्या).
  • प्लॅस्टिक डिश, बाऊल, पंटेनर (डबे), प्लेट्स, कप, ग्लासेस, कटलरी जसे काटे, चमचे, चाकू, पिण्यासाठीचे स्ट्रॉ, ट्रे, स्टिरर्स.
  • नॉन ओव्हन पॉलीप्रॉपीलीन बॅग्स – 60 ग्रॅम प्रति चौरस मीटर (स्क्वेअर मीटर) (जीएसएम) पेक्षा कमी वजन असलेल्या  प्लॅस्टिक कोटिंग, प्लॅस्टिक थर असणाऱ्या पेपर/अ‍ॅल्युमिनियम इत्यादीपासून बनविलेल्या डिस्पोजेबल डिश, कप, प्लेट्स आदी.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;