दादा गट पाकीटमारांची टोळी, आव्हाडांनी डागली तोफ

दादा गट पाकीटमारांची टोळी, आव्हाडांनी डागली तोफ

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणी स्थापन केला? तर शरद पवारांनी. पण एक दिवस अजित पवार अचानक आले आणि त्यांनी पवारांनाच धक्के मारून बाहेर काढले. एवढेच नाही तर, जाता जाता त्यांनी पक्षाचे चिन्हदेखील चोरून नेले. अजित पवार म्हणजे पाकीटमारांची टोळी असल्याचा जबरदस्त घणाघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुंब्य्रातील उमेदवार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

मुंब्य्रात चौकसभेत आव्हाड म्हणाले की, तुम्ही मर्दाची औलाद असता तर भाजपकडे गेला नसता. शरद पवारांनी फाटाफुटीनंतर तुतारी निशाण हाती घेतले. आता मी दुसरी कोणती तरी निशाणी घेऊन लढेन असे अजित पवार म्हणाले असते तर त्यांना मी मर्द म्हटले असते. पण दुसऱ्याचे चिन्ह चोरून ते निवडणूक लढवीत आहेत, अशा शब्दांत आव्हाड यांनी समाचार घेतला.

साहेब 18 तास काम करतात

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी बोलताना जिंतेद्र आव्हाड अत्यंत भावुक झाले. आव्हाड म्हणाले की, गंभीर आजार असूनही शरद पवार आजही दिवसातले

18 तास काम करतात. जनतेसाठी ते लढवय्ये म्हणून निवडणुकीच्या मैदानात उतरले असून मतदार पाकीटमारांच्या टोळीला नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाहीत, असेही आव्हाड यांनी बजावले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;