मराठा समाजाला बेजार केले त्यांची जिरवणारच!, मनोज जरांगे यांचा फडणवीसांवर हल्ला

मराठा समाजाला बेजार केले त्यांची जिरवणारच!, मनोज जरांगे यांचा फडणवीसांवर हल्ला

मराठा समाजाला आरक्षणासाठी बेजार केले त्यांची जिरवणारच असा जोरदार हल्ला मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आज केला. मराठय़ांचे मतदारसंघ ठरले असून ताकद आहे तिथे जोर लावणार, बाकी ठिकाणी पाडापाडी करणार, असा इशाराही जरांगे यांनी दिला आहे.

जरांगे यांनी आज उमेदवार देण्यात येणाऱ्या मतदारसंघांची घोषणा अंतरवाली सराटीतून केली. राजकारणाच्या नादात समाज हरता कामा नये. एक दोन दिवस माझ्यावर नाराज व्हायचे तर व्हा. पण उमेदवार पडून अपमान सहन करण्याची ताकद आपल्यात नाही, असे म्हणत मनोज जरांगे यांनी काही मतदारसंघांची घोषणा केली.

एससी-एसटीच्या उमेदवारांना मराठ्यांचे मतदान करायचे असे त्यांनी सांगितले. एखादा आमदार निवडून आला तरी तो आपल्यासाठी आधार ठरेल. 200 लढून पडण्यात अर्थ नाही. आपल्याला शत्रू खूप आहेत. निवडून आलेला आमदार विधानसभेत मराठा आरक्षण मुद्यावर भांडेल, असे जरांगे म्हणाले.

इथे उमेदवार देणार

फुलंब्री आणि कन्नड (संभाजीनगर)
बीड आणि केज (बीड)
परतूर (जालना)
पाथरी
हदगाव (नांदेड)
पुणे व दौंड

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;