केंद्रीय मंत्र्याचा अजब कारभार, धार्मिक कार्यक्रमासाठी रुग्णवाहिकेतून प्रवास; गुन्हा दाखल

केंद्रीय मंत्र्याचा अजब कारभार, धार्मिक कार्यक्रमासाठी रुग्णवाहिकेतून प्रवास; गुन्हा दाखल

धार्मिक कार्यक्रमासाठी रुग्णवाहिकेतून प्रवास केल्याप्रकरणी मोदीच्या मंत्रिमंडाळातील एका मंत्र्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्रिशूर पूरम उत्सवाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी रुग्णवाहिकेचा गैरवापर केल्याप्रकरणी केरळ पोलिसांनी केंद्रीय मंत्री सुरेश गोपी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) आणि मोटार वाहन कायद्याच्या अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्रिशूर पूरम हा केरळमधील प्रसिद्ध मंदिर उत्सव आहे.

गोपी यांनी रुग्णवाहिकेचा गैरवापर केल्याचा आरोप राज्यातील काँग्रेसच्या एका नेत्याने केला होता. तसेच त्रिशूर उत्सवात गोपी यांच्यामुळेच गोंधळ निर्माण झाल्याचेही काँग्रेस नेत्याने म्हटले होते. सध्या याप्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.

सुरेश गोपी यांनी हे आरोप फेटाळून लावत या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. उत्सवात गोंधळ निर्माण झाल्याने काही तरुणांनी आपल्या बचावासाठी आपल्याला रुग्णवाहिकेत बसवल्याचा दावा गोपी यांनी केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;