भीम आर्मी प्रमुख प्रवास करत असलेल्या वंदे भारत ट्रेनवर हल्ला, खिडक्यांच्या काचा फुटल्या

भीम आर्मी प्रमुख प्रवास करत असलेल्या वंदे भारत ट्रेनवर हल्ला, खिडक्यांच्या काचा फुटल्या

भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद प्रवास करत असलेल्या वंदे भारत ट्रेनवर हल्ल्याची घटना रविवारी सकाळी घडली. दिल्लीहून कानपूरला जात असताना वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनवर सकाळी 7.12 वाजण्याच्या सुमारास दगडफेक करण्यात आली. उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातील कमालपूर स्थानकावरून जात असताना दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यात ट्रेनच्या खिडकीच्या काचांचे नुकसान झाले.

चंद्रशेखर आझाद यांनी आपल्या X अकाऊंटवर पोस्ट करत घटनेची माहिती दिली. “ट्रेनने कमालपूर स्टेशन ओलांडताच, काही असामाजिक घटकांनी दगडफेक केली. यामुळे माझ्या दोन सीटच्या पुढे बसलेल्या प्रवाशाजवळील खिडकीची काच फुटली. या घटनेमुळे मला धक्का बसला आणि मी स्तब्ध झालो”, असे आझाद यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

तसेच आझाद यांनी केवळ सरकारी मालमत्तेच्या नुकसानाबाबतच नाही तर प्रवाशांच्या सुरक्षेबद्दलही चिंता व्यक्त केली आहे. असे कृत्य “निंदनीय आणि सहन केले जाऊ शकत नाही” असेही आझाद म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;