सुहाना-आर्यन-अबराम यांच्यातील भांडणांबद्दल शाहरुख म्हणाला, “प्रॉपर्टीच्या विभाजनात..”

सुहाना-आर्यन-अबराम यांच्यातील भांडणांबद्दल शाहरुख म्हणाला, “प्रॉपर्टीच्या विभाजनात..”

बॉलिवूडचा किंग अर्थात अभिनेता शाहरुख खानने 2 नोव्हेंबर रोजी आपला 59 वा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसानिमित्त त्याने चाहत्यांची खास भेट घेतली. ‘एसआरके डे’ या कार्यक्रमाला त्याने संध्याकाळी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात त्याने चाहत्यांच्या विविध प्रश्नांची मजेशीर उत्तरंसुद्धा दिली. यावेळी तो ‘बादशाह ओ बादशाह’ या गाण्यावरसुद्धा थिरकला. वाढदिवसानिमित्त भेटायला आलेल्या असंख्य चाहत्यांना त्याने अभिवादन केलं. यावेळी काही चाहत्यांना शाहरुखला त्याच्या मुलांविषयी प्रश्न विचारला. आर्यन, सुहाना आणि अबराम यांच्यात जेव्हा भांडणं होतात, तेव्हा तू कोणाची बाजू घेतोस, असा प्रश्न शाहरुखला विचारण्यात आला होता. त्यावर त्याने दिलेल्या गमतीशीर उत्तराची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

“तसं तर त्यांच्यात भांडणं होत नाहीत. खरंतर खूप विचित्र बाब आहे. मीसुद्धा हाच विचार करतो की त्यांच्यात आजवर भांडणं का झाली नाहीत? त्यांच्यात भांडणं होऊसुद्धा नये. अन्यथा संपत्तीच्या विभाजनात खूप मोठी समस्या निर्माण होईल”, असं उत्तर शाहरुखने देताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. यावेळी शाहरुखने त्याच्या वाढदिवसाची सुरुवात कशी झाली, याविषयी सांगितलं. सकाळी उठताच अबरामचा आयपॅड खराब झाला, तर शाहरुखला तो ठीक करावा लागला. त्यानंतर सुहानाच्या वॉर्डरोबमधील समस्या त्याला सोडवावी लागली. “मी हे माझ्या कुटुंबाकडून शिकलोय की तुमची किती मुलं आहेत, त्यावरून तुमच्या संयमाची पातळी ठरते. माझ्या घरातून शिकलेली ही गोष्ट मी माझ्या कामातही लागू करतो. माझ्या शूटदरम्यान, कामादरम्यान ज्या समस्या निर्माण होतात, त्या मी सोडवण्याचा प्रयत्न करतो. माझ्या मते माझ्या कुटुंबाकडून मी संयम ही खूप मोठी गोष्ट शिकलोय”, असं शाहरुख पुढे म्हणतो.

दरवर्षी शाहरुख त्याच्या वाढदिवशी ‘मन्नत’ बंगल्याच्या टेरेसवर येऊन चाहत्यांना अभिवादन करतो. मात्र यंदाच्या वर्षी त्याने असं करणं टाळलं. त्याऐवजी तो वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या खास कार्यक्रमाला उपस्थित राहिला आणि तिथे त्याने चाहत्यांशी संवाद साधला. शाहरुखच्या वाढदिवशी सोशल मीडियावर चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी शुभेच्छांचा वर्षाव केला. तर पत्नी गौरी खाननेही शाहरुखसोबतचा खास फोटो पोस्ट करत त्याला शुभेच्छा दिल्या.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;