भाजपच्या माजी नगरसेविका भीमाबाई फुगेंनी तुतारी फुंकली

भाजपच्या माजी नगरसेविका भीमाबाई फुगेंनी तुतारी फुंकली

भाजपच्या माजी नगरसेविका भीमाबाई पोपटराव फुगे यांनी स्थानिक नेतृत्वाच्या दबावाला कंटाळून भाजपला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. भीमाबाई फुगे, सम्राट फुगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पक्षप्रवेशामुळे उमेदवार अजित गव्हाणे यांची ताकद वाढली आहे.

बारामती येथे गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमध्ये फुगे यांनी पक्षप्रवेश केला. रविकांत वरपे, विनायक रणसुभे, विशाल वाकडकर, विशाल काळभोर, ह.भ.प. राजाराम महाराज फुगे, राणोजी कंद, दामोदर फुगे, गणपत गव्हाणे, रोहिदास माने आदी उपस्थित होते. भीमाबाई फुगे यांच्यासोबत सम्राट फुगे, प्रसाद कोलते, प्रशांत लांडगे, सुदेश लोखंडे, गणेश कंद आदींनी पक्ष प्रवेश केला.

फुगेंच्या प्रवेशामुळे भोसरीतील समीकरणे बदलणार आहेत. यापूर्वी मोशीतील लक्ष्मण सस्ते यांनी भाजपमधून बाहेर पडत गव्हाणे यांच्यासोबत काम करणार असल्याचे सांगितले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;