UP Hit & Run : भरधाव कारने महिलेला धडक दिली, मग 100 फूट फरफटत नेले

UP Hit & Run : भरधाव कारने महिलेला धडक दिली, मग 100 फूट फरफटत नेले

उत्तर प्रदेशात हिट अँड रनचे प्रकरण उघडकीस आले आहे. आजारी नातेवाईकाला पहायला गेलेल्या महिलेला भरधाव कारने धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की महिला हवेत उडाली आणि कारच्या बोनेटवर पडली. मात्र चालकाने गाडी न थांबवता महिलेला 100 फूट फरफटत नेले. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेचा मृतदेह ताब्यात घेत पुढील कारवाई सुरू केली.

गुड्डो रायकवार ही 55 वर्षीय महिला शुक्रवारी रात्री नवाबाद येथील मॅक्स रुग्णालयात आपल्या आजारी नातेवाईकाला पहायला गेली होती. रुग्णालयातून घरी परतत असताना रस्ता ओलांडताना भरधाव व्हॅगनर कारने महिलेला धडक दिली. धडक देताच महिला हवेत उडाली आणि कारच्या बोनेटवर पडली. यानंतर मुजोर चालकाने गाडी न थांबवता महिलेला फरफरटत नेले.

पुढे जाऊन कारने अन्य वाहनांनादेखील धडक दिली. यानंतर कार चालक फरार झाला. महिलेला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. सीसीटीव्हीच्या फुटेजच्या आधारे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;