गोरेगावमध्ये इमारतीच्या दुसऱ्या मजल्याला आग, दोघांची प्रकृती अत्यावस्थ

गोरेगावमध्ये इमारतीच्या दुसऱ्या मजल्याला आग, दोघांची प्रकृती अत्यावस्थ

गोरेगाव पश्चिमेला एका निवासी इमारतीला आग लागल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. उच्चभ्रू वस्ती असलेल्या कल्पतरू रेडियनस या 31 मजल इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली. आगीमुळे गुदमरल्याने दोघांची प्रकृती अत्यवस्थ आहे.

जखमींना तात्काळ उपचारासाठी ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मनोज चौहान आणि शहाबुद्दीन अशी आगीत गुदमरलेल्या दोघांची नावे आहेत. दोघांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे महानगरपालिकेने निवेदनात म्हटले आहे.

शनिवारी दुपारी 12.49 वाजता इमारतीत आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्नीशमल दलाच्या गाड्या घटनास्थळी तात्काळ दाखल झाल्या. दुपारी 2.18 वाजण्याच्या सुमारास आग विझवण्यात आली. आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;