मध्य प्रदेशात धक्कादायक घटना, पतीच्या निधनानंतर गर्भवती पत्नीला रुग्णालयातील बेड साफ करायला लावला

मध्य प्रदेशात धक्कादायक घटना, पतीच्या निधनानंतर गर्भवती पत्नीला रुग्णालयातील बेड साफ करायला लावला

मध्य प्रदेशात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पतीच्या निधनानंतर त्याला रूग्णालयात ठेवण्यात आलेला बेड गर्भवती पत्नीकडून साफ करून घेतल्याची घटना दिंडोरीतल जिल्हा रूग्णालयात घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओमध्ये गर्भवती महिला बेड साफ करताना दिसत आहेत. तसेच रुग्णालयातील कर्मचारी तिला सूचना करताना आणि पाण्याची बॉटल देताना दिसत आहेत. मात्र रुग्णालय प्रशासनाने महिलेला बेड साफ करायला लावल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. महिलेला बेड साफ करायला सांगितला नव्हता. महिला स्वतः पतीच्या रक्ताचे नमुने घेत होती, असे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सांगतिले.

जनिमीच्या वादातून महिलेचा पती,तिचे दोन दिर आणि सासऱ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात महिलेचा सासरा आणि दोन दीर यांचा जागीच मृत्यू झाला. तर महिलेचा पती रामराज मारवी हा गंभीर जखमी झाला.

रामराजला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. रामराजच्या मृत्यूनंतर त्याला ज्या बेडवर ठेवण्यात आले होते, तो बेड रुग्णालयातील कर्मचाऱ्याला त्याच्या पत्नीला साफ करायला लावला. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर ही सर्व प्रकार उघडकीस आला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;