पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवस पश्चिम विदर्भ दौऱ्यावर, प्रचाराचा उडणार धुरळा

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवस पश्चिम विदर्भ दौऱ्यावर, प्रचाराचा उडणार धुरळा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 7 व 8 नोव्हेंबर दोन दिवस शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ पश्चिम विदर्भ दौऱ्यावर येणार आहेत. बुलढाणा येथे 8 नोव्हेंबर रोजी जयश्री शेळके यांच्या प्रचारार्थ दुपारी तीन वाजता तर मेहकर चे उमेदवार सिध्दार्थ खरात यांच्या प्रचारार्थ सायंकाळी पाच वाजता सभा आयोजित केल्या आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 5 नोव्हेंबर रोजी प्रचाराचा शुभारंभ कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शन घेऊन करतील. पश्चिम विदर्भात शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी 7 व 8 नोव्हेंबर दोन दिवस प्रचाराचा झंझावात राहणार असून 7 नोव्हेंबर दुपारी 1 वाजता दर्यापूर विधानसभा, तीन वाजता तिवसा विधानसभा, सायंकाळी 4 वाजता बडनेरा विधानसभा तर सायंकाळी 7 वाजता नितीन देशमुख यांच्या प्रचारार्थ सभा होणार आहे.

8 नोव्हेंबरला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बुलढाणा जिल्ह्यात दोन सभा घेतील. बुलढाण्यात सभा 8 नोव्हेंबर दुपारी तीन वाजता तर मेहकरची सभा सायंकाळी पाच वाजता होणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;