दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर खळबळ, दुबईहून आलेल्या एअर इंडियाच्या विमानात काडतूस सापडले

दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर खळबळ, दुबईहून आलेल्या एअर इंडियाच्या विमानात काडतूस सापडले

विमानात बॉम्ब ठेवल्याच्या धमक्या मिळत असतानाच एअर इंडियाच्या विमानात काडतूस सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. दुबईहून दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या एअर इंडियाच्या विमानात काडतूस आढळल्याचे शनिवारी उघडकीस आले. याप्रकरणी एअर इंडियाने विमानतळ पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.

एअर इंडियाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, 27 ऑक्टोबर रोजी AI 916 हे विमान दुबईहून दिल्लीला आले. यावेळी सीटच्या पाकिटात एक काडतूस सापडले. सुदैवाने यात कोणतीही प्रवाशाची हानी झाली नाही. सर्व प्रवाशांना विमानातून सुखरूप बाहेर काढण्यात आले.

हे काडतूस विमानात कसे आले? कुणी ठेवले? याबाबत पोलीस सखोल तपास करत आहेत. गेल्या महिन्यात 13 दिवसांत इंडियन एअरलाइन्सच्या 300 हून अधिक विमानांना बॉम्बची धमकी मिळाली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून बहुतांश धमक्या देण्यात आल्या होत्या.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;