Jammu-Kashmir : अनंतनागमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान, खानयारमध्ये दोन ते तीन दहशतवाद्यांना घेरले

Jammu-Kashmir : अनंतनागमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान, खानयारमध्ये दोन ते तीन दहशतवाद्यांना घेरले

जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारी सकाळपासूनच सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकी सुरू आहेत. अनंतनागमध्ये सुरू असलेल्या सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. तर दुसरीकडे श्रीनगरच्या खानयारमध्ये सुरक्षा दलांनी दोन ते तीन दहशतवाद्यांना घेरले असून येथे अधूनमधून गोळीबार सुरू आहे.

खानयारमधील एक व्हिडिओही समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये सुरक्षा दल दहशतवाद्यांचा शोध घेत त्यांना घेरताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये गोळीबार आणि स्फोटांचे आवाजही येत आहेत. खानयारमध्ये 2 ते 3 दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी घेरले असल्याचे सांगण्यात येत आहे. परिसरात पोलीस आणि सीआरपीएफची संयुक्त कारवाई सुरू आहे.

गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सतत चकमकी होत आहेत. दहशतवाद्यांकडून अनेकदा घुसखोरीचा प्रयत्नही करण्यात आला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;