राजस्थानमध्ये मावा फॅक्टरीत बॉयलरचा स्फोट, दोन मजुरांचा मृत्यू

राजस्थानमध्ये मावा फॅक्टरीत बॉयलरचा स्फोट, दोन मजुरांचा मृत्यू

राजस्थानमधील मावा बनवणाऱ्या फॅक्टरीत बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली. या स्फोटात फॅक्टरीतील दोन मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. भिलवाडा जिल्ह्यातील नारायणपूर गावात ही घटना घडली. महादेव गुर्जर आणि राधेश्याम गुर्जर अशी मयतांची नावे आहेत.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीनिमित्त अन्य कामगार सुट्टीवर गेले होते. त्यामुळे घटनेवेळी फॅक्टरीत केवळ दोघे मयत उपस्थित होते. दोघांच्या अपघाती मृत्यूमुळे ऐन सणासुदीत कुटुंबावर शोककळा पसरली आहे. बॉयलरचा स्फोट नेमका कशामुळे झाला हे अद्याप कळू शकले नाही. पोलीस घटनेचा सखोल तपास करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;