आमचा विश्वास फक्त ‘मातोश्री’ वरच; ज्येष्ठ शिवसैनिक प्रकाश म्हात्रे यांनी मिंध्यांना ठणकावले

आमचा विश्वास फक्त ‘मातोश्री’ वरच; ज्येष्ठ शिवसैनिक प्रकाश म्हात्रे यांनी मिंध्यांना ठणकावले

कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार सुभाष भोईर यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. या निवडणुकीत गद्दारांना घरचा रस्ता दाखवणार असून आमचा विश्वास फक्त ‘मातोश्री’वरच आहे अशा शब्दात ज्येष्ठ शिवसैनिक प्रकाश म्हात्रे यांनी मिंध्यांना ठणकावले आहे. प्रकाश म्हात्रे हे सुभाष भोईर यांच्या प्रचारात जोमाने उतरले असून कोणत्याही परिस्थितीत त्यांना निवडून आणणारच असा निर्धार व्यक्त केला.

कल्याण ग्रामीणमधून शिवसेनेचे सुभाष भोईर, मिंधे गटाचे राजेश मोरे व मनसेचे राजू पाटील अशी तिरंगी लढत होणार आहे. पण ग्रामीण भागातील मतदारांचा भोईर यांना जोरदार पाठिंबा आहे. घरोघरी मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेण्यावर जोर दिला असून संपूर्ण प्रचाराच्या यंत्रणेत शिवसैनिक प्रकाश म्हात्रे यांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला आहे. म्हात्रे हे कल्याण ग्रामीणमधील अनुभवी व ज्येष्ठ शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. त्यांनी ठाणे जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणूनही काम केले आहे. त्याशिवाय उपजिल्हाप्रमुखपद सांभाळताना त्यांनी अनेक शाखा सुरू करून तळागाळात शिवसेना पोहोचवली.

मिंध्यांचे पदाधिकारी गोपाळ लांडगे यांना माझ्यावर कारवाई करण्याचा काय अधिकार आहे? मी लिखित स्वरूपात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा सदस्य आहे. त्यांनी आम्हाला बोलायला भाग पाडू नये, नाहीतर लांडगे यांचे सगळे गुऱ्हाळ बाहेर काढू. त्यामुळे त्यांची मोठी पंचाईत होईल.
– प्रकाश म्हात्रे (निष्ठावंत शिवसैनिक)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;