महेश सावंत यांच्या निवडणूक कार्यालयाचे आज उद्घाटन

महेश सावंत यांच्या निवडणूक कार्यालयाचे आज उद्घाटन

माहीम विधानसभा मतदारासंघातील शिवसेनेचे उमेदवार महेश सावंत यांच्या निवडणूक कार्यालयाचे शनिवारी संध्याकाळी खासदार अनिल देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. माहीम लेडी जमशेटजी मार्गावरील येथील शोभा हॉटेलजवळील काद्री वाडीत महेश सावंत यांचे मुख्य निवडणूक कार्यालय सुरू होत आहे. संध्याकाळी सात वाजता या कार्यालयाचे उद्घाटन होईल.

बीडमध्ये काका आणि दोन पुतणे निवडणुकीच्या रिंगणात

बीड विधानसभा मतदारसंघात काका विरुद्ध दोन पुतणे असा संघर्ष पाहायला मिळणार आहे. जयदत्त क्षीरसागर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर पुतण्या संदीप हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून आणि दुसरा पुतण्या योगेश अजित पवार गटाकडून निवडणूक लढवत आहेत. 2019च्या निवडणुकीत जयदत्त क्षीरसागर विरुद्ध पुतण्या संदीप असा थेट सामना झाला होता. आता दुसरा पुतण्याही निवडणूक रिंगणात उतरला आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील घराबाहेर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. गुप्तचर अहवालात फडणवीस यांना धोका होण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फोर्स वनचे अतिरिक्त 10 ते 12 कमांडो तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;