तृप्ती सावंत यांची झिशान सिद्दिकीशी छुपी युती, मनसे नेत्याकडून पर्दाफाश

तृप्ती सावंत यांची झिशान सिद्दिकीशी छुपी युती, मनसे नेत्याकडून पर्दाफाश

वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील मनसेच्या उमेदवार तृप्ती सावंत यांची अजित पवार गटाचे उमेदवार झिशान सिद्दिकी यांच्याशी छुपी युती आहे, असा गंभीर आरोप मनसेच्या नेत्याने केला आहे. हा केवळ आरोप नसून आपल्याकडे याचा पुरावा आहे, असे सांगत त्यांनी एक फोटोही समाजमाध्यमांवर शेअर केला  आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

मनसे नेते अखिल चित्रे यांनी झिशान सिद्दिकी आणि भाजप पदाधिकारी यांच्यासोबतच्या भेटीचा एक फोटो शेअर केला आहे. 28 ऑक्टोबर रोजी वेळ साधारणतः रात्री साडे नऊ ते साडे दहाच्या सुमारास मकबा हाईट्स या ठिकाणी ही बैठक झाली असून तिथे झिशान सिद्दिकी यांच्याबरोबर सौदा केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;