महायुतीत बंडखोरीमुळे संघर्ष वाढणार; बंडोबा थंडावले नाही तर फटका बसणार

महायुतीत बंडखोरीमुळे संघर्ष वाढणार; बंडोबा थंडावले नाही तर फटका बसणार

महायुतीत आलबेल नसल्याचे अनेकदा दिसून आले आहे. सुरुवातील जागावाटपावरून तिन्ही घटकांमध्ये संघर्ष होता. जागावाटप झाल्यावर उमेदवारच सापडेना अशी मिंधे आणि अजित पवार गटाची अवस्था झाली. त्याचा फायदा घेत भाजपने आपले चेलेचपाटे घुसवले. त्यामुळे नाराज झालेल्या अनेक नाराजांनी आता बंडाचे निशाण फडकावले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे टेन्शन वाढले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 4 नोव्हेंबर आहे. तोपर्यंत हे बंड शमवण्यात आणि नाराजांची मनधरणी करण्यात महायुतीला यश आले नाही तर त्यांना जागांचा फटका बसणार आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

महायुतीत तिन्ही घटकांमध्ये इच्छुकांची संख्याही वाढलेली आहे. महायुतीतसुमारे 36 जणांनी बंडखोरी केलेली आहे. भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाने एकमेकांविरोधात उमेदवार उभए केले आहेत. तसेच नाराजांनी देखील मोठ्या प्रमाणावर बंड केले आहे. नाराजांची मनधरणी करत त्यांचे बंड शमविण्याचे आव्हान महायुतीसमोर आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची ताऱीख 4 नोव्हेंबर आहे. त्यामुळे येत्या तीन दिवसांत महायुतीला बंडोबांची नाराजी दूर करावी लागणार आहे. बंडोबा त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिले तर राज्यात सुमारे 50 जागांवर महायुतीला फटका बसण्याची शक्यता आहे. महायुतीत 36 बंडखोर उभे ठाकले आहेत. भाजपाने साम दाम दंड भेद वापरून बंडखोरीच्या तयारीत असलेल्या काही बंडोबांना थंडोबा केले आहे. मात्र, सर्वाधिक बंडखोर भाजपचेच आहे. त्यामुळे मिंधे आणि अजित पवार गटालाही मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. मिंधे गटाच्या बंडखोरांनी 16 जागांवर आव्हान दिले आहे. तर अजित पवारांच्या गटाच्या एकाने बंडखोरी केली आहे. बंडखोर आणि नाराजांमुळे महायुतीचे टेन्शन वाढले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;