मोठी बातमी ! KBC 16मध्ये ऐश्वर्या आणि आराध्याचं नाव घेण्यास अमिताभ यांची टाळाटाळ; घटस्फोटाच्या…

मोठी बातमी ! KBC 16मध्ये ऐश्वर्या आणि आराध्याचं नाव घेण्यास अमिताभ यांची टाळाटाळ; घटस्फोटाच्या…

अभिषेक आणि ऐश्वर्या राय यांच्या संसाराबाबतच्या सतत चर्चा सुरू आहेत. दोघांमध्ये जमत नसून प्रकरण घटस्फोटापर्यंत गेल्याची चर्चा आहे. बच्चन कुटुंबाकडून या चर्चांवर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. सेलिब्रिटींबाबत अशा अफवा नेहमी उठत असतात. त्यामुळेही बच्चन कुटुंबाला यावर प्रतिक्रिया द्यावीशी वाटली नसावी. पण बच्चन कुटुंबात काही गोष्टी अशा घडत आहेत की त्यामुळे अभिषेक आणि ऐश्वर्यात सर्व काही अलबेल नसल्याचं दिसून येत आहे. केबीसी16च्या एका भागात तर अमिताभ बच्चन यांनी सून ऐश्वर्या आणि नात आराध्या यांचं नाव घेण्यास टाळाटाळ केली आहे. त्यामुळे ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या चर्चांना अधिकच बळ मिळत आहे.

सोशल मीडियावर अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायच्या घटस्फोटाच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. गेल्या काही महिन्यांपासून या चर्चा सुरू आहेत. त्यात बच्चन कुटुंब काहीच बोलत नसल्याने या चर्चांना खतपाणी मिळताना दिसत आहे. ‘दसवी फेम’ अभिनेत्री निम्रत कौर हिच्यासोबत अभिषेकचं अफेयर सुरू असल्याने ऐश्वर्या आणि अभिषेकच्या नात्यात तणाव आल्याचं सांगितलं जात आहे. तसेच श्वेता बच्चन आणि जया बच्चन यांच्या स्वभावामुळेही ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या नात्यात अडचणी आल्याचं काही लोक सांगत आहे. प्रत्येक जण आपआपली थिअरी मांडताना दिसत आहे.

सुनेचं नाव घेण्यास टाळाटाळ

महायनायक अमिताभ बच्चन हे केबीसी 16च्या एका भागात स्पर्धकासोबत होते. त्यावेळी अमिताभ यांच्या चाहत्यांनी काही गोष्टी नोटीस केल्या. केबीसीच्या एका एपिसोडमध्ये ‘बंटी और बबली’ या सिनेमातील ‘कजरा रे कजरा रे’ या गाण्याशी संबंधित एक सवाल विचारण्यात आला. यावेळी अमिताभ यांनी या गाण्याची माहिती देताना अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जीचं नाव घेतलं. पण ऐश्वर्याचं नाव घेतलं नाही. विशेष म्हणजे ऐश्वर्यावरच हे गाणं चित्रित झालं होतं. ती या गाण्याची मुख्य भाग होती. तरीही अमिताभ यांनी ऐश्वर्याचा उल्लेख टाळल्याने चाहत्यांना आश्चर्य वाटलं.

आराध्याचं नावही नाही

याच प्रकारे आणखी एका एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन यांनी नातवंडांचा उल्लेख केला. त्यांनी नव्या आणि अगस्त्यचं नाव घेतलं. पण आराध्याचं नाव घेतलं नाही. केबीसीच्या वेगवेगळ्या भागात अमिताभ यांनी ऐश्वर्या आणि आराध्याचं नाव घेतलं नाही. सून आणि नातीच्या नावाचा उल्लेख करणं टाळलं. त्यामुळे अभिषेक आणि ऐश्वर्या यांचे मार्ग वेगळे झालेत का? अशी चर्चा जोर धरत आहे. मात्र, बच्चन कुटुंबीयांनी या मुद्द्यावर काहीच भाष्य केलंलं नाही. त्यामुळे बच्चन कुटुंबात चाललंय काय? असा सवाल चाहत्यांना पडला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;