अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती; मुंबईत 22 व्या मजल्यावर घेतलं 3BHK घर

अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती; मुंबईत 22 व्या मजल्यावर घेतलं 3BHK घर

अभिनेत्री अमृता खानविलकरसाठी हे वर्ष खूपच खास ठरलं आहे. या वर्षभरात अमृता दमदार प्रोजेक्ट्समुळे चर्चेत राहिली. आता वर्षाअखेरीस दिवाळीनिमित्त तिची मोठी स्वप्नपूर्ती झाली आहे. अमृताने सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला असून त्यावर नेटकऱ्यांसह मराठी सिनेसृष्टीतील कलाकार शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. या व्हिडीओद्वारे अमृताने तिच्या नव्या घराची झलक दाखवली आहे. मुंबईत स्वत:चं घर घेण्याचं तिचं स्वप्न अखेर पूर्ण झालं आहे. अमृताने तिच्या या घराला एक गोड नावदेखील दिलं आहे. टोलेजंग इमारतीच्या 22 व्या मजल्यावर अमृताचं हे घर आहे. या घरात तिने हा खास व्हिडीओ शूट केला आहे.

हा व्हिडीओ पोस्ट करत अमृताने लिहिलं, ‘चला भेट झालीच आपली. कधी काळी दूर कुठेतरी तुझं स्वप्न पाहिलं होतं आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्न रोज सुरू होता. तर ही आपली पहिली दिवाळी.. तुला खूप गोष्टी सांगायच्या आहेत. मला काय आवडतं, काय नाही, मनातलं गुपित, शांततेतलं.. सारं काही. हळूहळू तुला कळेलच. तुलाही मला खूप काही सांगायचं असेल. माझी पूर्ण तयारी आहे. तू अजून हळूहळू आकार घेतोयस, तुझ्या कानाकोपऱ्यात मी माझं सगळं जग बसवायचा प्रयत्न करतेय. तू ही अगदी माझ्या हो ला हो म्हणतोयस. आवडतंय मला.. लवकरच भेटू, नव्या कोऱ्या भिंतींसह, नव्या आठवणी बनवण्यासाठी, नवं आयुष्य उलगडण्यासाठी- हॅपी दिवाळी.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

याबद्दल अमृता म्हणाली, “स्वप्नांच्या या शहरात घर विकत घेणं हे खरंच एक स्वप्न पूर्ण होण्यासारखं वाटतंय. आज माझ्या वाढदिवसाच्या महिन्याच्या सुरुवातीला आणि लक्ष्मीपुजेच्या या शुभवेळी मी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठ्या लक्ष्मीचं स्वागत करतेय. माझी गृहलक्ष्मी, माझी आई. नेहमीच मला एक असं स्वतःचं घर हवं होतं, जे माझ्या मेहनतीनं आणि प्रेमानं तयार झालेलं असावं. माझ्या कुटुंबासाठी, मित्र -मैत्रिणी आणि निर्वाण-नूर्वीसाठी हे घर हवं होतं. एक असं घर, जिथं आम्ही सगळे एकत्र येऊ शकतो, अनेक खास क्षण साजरे करू शकतो आणि जीवनातील सुंदर क्षण अनुभवू शकतो.”

मुंबईत घर घेणं हे खूपच स्वप्नवत वाटतंय. 22 व्या मजल्यावर असलेलं हे माझं छोटंसं तीन बीएचके विश्व. मी त्याला ‘एकम’ असं नाव दिलंय आणि नवीन सुरूवात केली आहे,” अशा शब्दांत अमृताने भावना व्यक्त केल्या आहेत. दिवाळीच्या खास मुहूर्ताच्या सोबतीने अमृताच्या बर्थडे महिन्याचीही सुरुवात झाली आहे. त्यामुळे हा खास योगायोग जुळून आला आहे. फॅशन असो किंवा वैविध्यपूर्ण भूमिका नेहमीच चोख पार पाडून अमृताने प्रेक्षकांना मोहीत केलं आहे आणि 2024 वर्ष तिच्यासाठी खूपच खास ठरलं आहे. आगामी काळात अमृता अनेक नवनवीन हिंदी आणि मराठी प्रोजेक्ट्समध्ये दिसणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;