दिवाळीनिमित्त श्री विठ्ठल मंदिरात फुलांची आरास; विठुरायाच्या मनमोहक दर्शनाने भाविक सुखावले

दिवाळीनिमित्त श्री विठ्ठल मंदिरात फुलांची आरास; विठुरायाच्या मनमोहक दर्शनाने भाविक सुखावले

दीपावली सणाच्या निमित्ताने पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये फुलांची सजावट करण्यात आली आहे. दिवाळी सणामध्ये विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. विविध रंगाच्या आकर्षक फुलांच्या आरास केल्याने देवाचे गोजिरे रुप पाहून भाविक सुखावत आहेत.

या सजावटीसाठी पांढरी शेवंती अंदाजे 650 किलो, भगवा झेंडु अंदाजे 180 किलो, पिवळा झेंडू अंदाजे 250 किलो, पिंक फुले (कण्हेर) अंदाजे 35 किलो, अष्टर अंदाजे 300 किलो, हिरवा पाला अंदाजे 200 माळा, गुलाब 100 गड्डी, कमिनी 300 गड्डी, शेवंती 100 गड्डी इत्यादी फुलांचा वापर करण्यात आला आहे. सेवेकरी अर्जुन हनुमान पिंगळे, बीड यांनी सेवाभावी तत्वावर मोफत फुलांची आरास करून दिली आहे. या फुलांच्या सजावटीसाठी श्री फ्लावर्स पुणे यांच्या सुमारे 25 कामगारांनी परिश्रम घेतल्याचे कार्यकारी अधिकारी श्री राजेंद्र शेळके यांनी सांगितले.

दिवाळीच्या लक्ष्मीपूजनानिमित्त विठ्ठल दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येत असतात. या पार्श्वभूमीवर मंदिराची केलेली आकर्षक सजावट मनमोहक दिसून येत असून, या सजावटीमुळे संपूर्ण मंदिराचं रुपडं अधिक आकर्षक झालं आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;