दाऊदशी माझा संबंध जोडणाऱ्यांना नोटीस बजावणार, भाजपा नेत्यांना नवाब मलिक यांचा इशारा

दाऊदशी माझा संबंध जोडणाऱ्यांना नोटीस बजावणार, भाजपा नेत्यांना नवाब मलिक यांचा इशारा

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील नेते नवाब मलिक यांचे दाऊदशी संबंध असल्याचा आरोप भाजपाच्या काही नेत्यांनी केला होता. त्याला नवाब मलिक यांनी आज प्रत्युत्तर दिले.  दाऊदशी संबंध जोडणाऱ्यांना कायदेशीर नोटीस बजावणार असल्याचा इशारा मलिक यांनी दिला. नवाब मलिक म्हणाले, माझ्या प्रचाराला या, असा आग्रह मी करत नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार आहे. जनतेच्या पाठबळाच्या आधारावर मी निवडणूक लढवत आहे. मात्र माझं नाव जे दाऊदशी जोडत आहेत त्यांच्यावर मी कायदेशीर कारवाई करणार आहे. मी माझी विचारसरणी बदलणार नाही. माझी माझ्या विचारांशी बांधिलकी आहे. नवाब मलिक यांना पक्षाने दिलेल्या उमेदवारीवरून सध्या महायुतीमध्ये वाद सुरू आहे. मागील निवडणुकीत ते अणुशक्तीनगर येथून विजयी झाले होते. यावेळी मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;