दीपावली नरकचतुर्दशीनिमित्त पंढरपूर येथे श्री विठ्ठल व रूक्मिणी मातेस अलंकार परिधान

दीपावली नरकचतुर्दशीनिमित्त पंढरपूर येथे श्री विठ्ठल व रूक्मिणी मातेस अलंकार परिधान

वसुबारस पासून दीपावली महोत्सवास सुरवात झाली आहे. आज नरकचतुर्दशी निमित्त दुपारी पोशाखावेळी दरवर्षी प्रथा परंपरेप्रमाणे पंढरपूर येथे श्री विठ्ठल व माता रुक्मिणीला अलंकार परिधान करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.

श्री विठ्ठलास सोन्याचा मुकुट , कौस्तुभ मणी, दंडपेठया, हिऱ्याचे कंगन जोड, मोत्याचा तुरा, मारवाडी पेठांचा मोत्यांचा हार, मोत्याची कंठी, शिरपेच, मोहरांची माळ, तुळशीची माळ, तोडे जोड, मत्स्य जोड, पदकासह लॉकेट तर श्री रुक्मिणी मातेस सोने मुकुट, वाक्या जोड, तोडे जोड, तानवड जोड, चिंचपेटी तांबडी, जवामनी पदक, जवेच्या माळा, लक्ष्मी हार, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, हायकोल, सरी, कंबरपट्टा इत्यादि अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत. तसेच श्री.राधिका मातेस चांदीचा मुकुट, पुतळ्यांची माळ, मोत्याचा कंठा, ठुशी नवीन व  श्री.सत्यभामा मातेस चांदीचा मुकुट, जाडवाचे बाजूबंद जोड, चिंचपेटी हिरवी, जडावाचा हार, पुतळ्यांची माळ, ठुशी नवीन, मण्या मोत्याच्या पटल्या जोड, मोत्याचा कंठा मोठा, नथ इत्यादी अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत.

तसेच आज नरकचतुर्दशी निमित्ताने विठ्ठल सभा मंडप येथे नंदू शिंदे, मुंबई यांनी श्री.विठ्ठलाची आकर्षक रांगोळी साकारली असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;