संसार मोडला, पतीने घराबाहेर काढलं, तरीही पूर्व पतीने दिली नाही साथ; म्हणाला “मी काय करू?”

संसार मोडला, पतीने घराबाहेर काढलं, तरीही पूर्व पतीने दिली नाही साथ; म्हणाला “मी काय करू?”

‘इस प्यार को क्या नाम दूँ’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दलजीत कौर तिच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत आहे. दलजीतने गेल्या वर्षी केन्यातील बिझनेसमन निखिल पटेलशी दुसरं लग्न केलं. लग्नानंतर ती मुलासोबत केन्यामध्ये राहू लागली. मात्र लग्नाच्या अवघ्या दहा महिन्यांतच ती मुलाला घेऊन भारतात परतली आणि त्यानंतर तिने निखिलवर विवाहबाह्य संबंधाचे आरोप केले. तर दुसरीकडे निखिलने दलजीतसोबतच्या लग्नाला मान्यता देण्यास नकार दिला. गेल्या काही महिन्यांपासून दलजीत त्याच्यावर विविध आरोप करत आहे. अशातच एका मुलाखतीत तिने पूर्व पती शालीन भनोतवरही काही आरोप केले होते. इतकं सगळं घडूनही शालीनने त्याच्या मुलाबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही, त्याने संपर्कच साधला नाही, असं दलजीत म्हणाली होती. यावर आता शालीनने प्रतिक्रिया दिली आहे.

‘टेली मसाला’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत शालीनला दलजीतच्या आरोपांविषयी प्रश्न विचारण्यात आला. तुझ्याबद्दल जे काही म्हटलं गेलं, ते तू वाचलंस का, असं त्याला विचारलं गेलं. त्यावर तो म्हणाला, “मी कधी शाळेत वाचलो नाही तर आता काय वाचणार? मी फक्त माझी स्क्रिप्ट वाचतो. आतासुद्धा मी तेच करतोय, खूपच रंजक आहे. मी गुगल करत नाही, काय करू मी? माझ्याबद्दल मला माहीत आहे, माझ्या आईवडिलांना माहीत आहे. त्यामुळे मी बाकी सर्व गोष्टी वाचत बसत नाही. मी फक्त खुश राहतो.” शालीनने दलजीतच्या आरोपांवर अप्रत्यक्षपणे असं उत्तर दिलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by DALLJIET KAUR ੴ (@kaurdalljiet)

दलजीतचे आरोप

“माझ्या पूर्व पतीसोबत गेल्या वर्षभरापासून माझा काहीच संपर्क नाही. कदाचित वर्षभराहून अधिक काळ उलटला असेल. त्यानेही कधीही आमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नाही. नऊ वर्षांपर्यंत मी त्याच्यासोबत खूप चांगल्याप्रकारे वागण्याचा प्रयत्न केला. जेव्हा जेव्हा त्याने मुलाला भेटण्याची इच्छा व्यक्त केली, मी जेडनला त्याला भेटू दिलं होतं. कारण हे माझ्या मुलासाठी चांगलं असेल असा मी विचार केला. पण नंतर केन्यामध्ये आमच्यासोबत काय घडलं, त्याच्या मुलासोबत काय घडलं याविषयी त्याने जाणून घेण्याचाही प्रयत्न केला नाही. त्याच्याकडे माझा नंबरही असावा, पण त्याने आजवर कॉल किंवा मेसेज केला नाही”, असं दलजीतने म्हटलं होतं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;