पुण्यासह राज्यात घरफोड्या करणारा सराईत अटकेत, तब्बल शंभरहून अधिक गुन्हे दाखल

पुण्यासह राज्यात घरफोड्या करणारा सराईत अटकेत, तब्बल शंभरहून अधिक गुन्हे दाखल

पुण्यासह राज्यातील विविध भागात घरफोडी, वाहनचोरी, दरोड्याचे गुन्हे करणार्‍या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा यूनिट सहाच्या पथकाने अटक केली. आरोपीवर विविध प्रकारचे 100 हून अधिक गुन्हे दाखल असून सध्या तो वॉन्टेड होता. वानवडी भागातून आरोपीला अटक करण्यात आली.

पापासिंग दयालसिंग दुधाणी (वय 50, रा. हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. गुन्हे शाखा यूनिट सहाचे पथक हद्दीत गस्तीवर होते. या दरम्यान घरफोडीतील सराईत गुन्हेगार दुधाणी हा वानवडीमधील बी. टी. कवडे रोड परिसरात थांबला असल्याची माहिती अंमलदार नितीन मुंढे यांना मिळाली. त्यानूसार पथकाने सापळा रचून दुधाणीला ताब्यात घेतले. दुधाणी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर पुण्यासह पिंपरी, सांगली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर वाहनचोरी, घरफोडी, दरोडा असे 100 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. आरोपीवर यापूर्वी मोक्का कारवाई करण्यात आली होती. गुन्हे शाखेचे उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली यूनिट सहाचे पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहायक निरीक्षक मदन कांबळे, अंमलदार बाळासाहेब सकटे, नितीन मुंढे, रमेश मेमाणे, सुहास तांबेकर, कानिफनाथ कारखेले यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;