जब्या-शालूचं जमलं! सोमनाथ अवघडे आणि राजेश्वरी खरातची लग्नगाठ?

जब्या-शालूचं जमलं! सोमनाथ अवघडे आणि राजेश्वरी खरातची लग्नगाठ?

नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेल्या फॅंन्ड्री चित्रपटातून प्रेक्षकांच्या पसंतीत आलेले पात्र जब्या आणि शालूचा एका फोटो सोशल मीडियावर प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे. राजेश्वरी खरातने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमुळे राजेश्वरी आणि सोमनाथ अवघडे यांच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. या फोटोकडे पाहून जब्या आणि शालू यांनी लगीनगाठ बांधली आहे का? असा प्रश्न पडला आहे.

या फोटोमध्ये सोमनाथ अवघडे आणि स्वत: राजेश्वरी दिसत आहेत. विशेष म्हणजे हे दोघेही लग्नमंडपात बसल्याचं दिसतंय. राजेश्वरी आणि सोमनाथच्या डोक्याला बाशिंग बांधले आहे. तसेच राजेश्वरीने पिवळी साडी परिधान केलेली आहे तर, सोमनाथ पांढऱ्या शुभ्र कपड्यांत दिसतोय. हा फोटो पाहून या दोघांचं मनोमिलन झालेलं असून ते लग्नाच्या बोहल्यावर चढले आहेत का? असं विचारलं जात आहे.

हा फोटो राजेश्वरी, सोमनाथच्या आगामी चित्रपटाचा भाग?

दरम्यान, याआधीही ही जोडी अनेकवेळा एकत्र दिसलेली आहे. दोघेही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. त्यांनी आपापल्या इन्स्टाग्रामवर एकमेकांसोबतचे अनेक फोटो आणि रिल्स पोस्ट केलेले आहेत. त्यामुळेच या दोघांचा एकमेकांसोबतचा बॉण्ड पाहून त्यांनी लग्न केलंय का? अशी विचारपूस त्यांच्या चाहत्यांकडून केली जात आहे. खरं म्हणजे हा फोटो त्यांच्या आगामी चित्रपटाचा एक भाग आहे का? अशी शंकाही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या फोटोमागचा नेमका अर्थ काय? हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;