महाविकास आघाडीची एकजूट; कल्याणमध्ये सचिन बासरे यांच्या प्रचाराचा धडाका

महाविकास आघाडीची एकजूट; कल्याणमध्ये सचिन बासरे यांच्या प्रचाराचा धडाका

कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार सचिन बासरे यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल केल्यानंतर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. प्रत्येक वॉर्डात महाविकास आघाडीची एकजूट पाहायला मिळत आहे.

उपनेते विजय साळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी सचिन बासरे यांचा अर्ज भरण्यासाठी भव्य रॅली निघाली. खांद्यावर भगवा, गळ्यात उपरणे, हाती मशाल घेऊन कोण आला रे कोण आला… शिवसेनेचा वाघ आला अशा घोषणा देत भगवेमय वातावरण तयार झाले होते. खडकपाडा ते वसंत व्हॅली येथील मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रापर्यंत महाविकास आघाडीचाच बोलबाला होता.

कल्याण पश्चिम हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून मशाल चिन्हासमोरील बटन दाबून मतदार सचिन बासरे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करतील असा विश्वास यावेळी विजय साळवी यांनी व्यक्त केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;