अत्याचार करून बालिकेची हत्या, संतप्त मोखाडावासीयांचा पोलीस ठाण्यावर मोर्चा

अत्याचार करून बालिकेची हत्या, संतप्त मोखाडावासीयांचा पोलीस ठाण्यावर मोर्चा

मोखाडय़ातील पिंपळाचा पाडा येथील आठ वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून नंतर तिची हत्या केल्याची घटना 28 ऑक्टोबर रोजी घडली होती. या घटनेतील संशयितास मोखाडा पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. मात्र या घटनेनंतर मोखाडावासीयांनी संताप व्यक्त करत आज नातेवाईकांसह ग्रामस्थांनी मोखाडा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. नराधमाला फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

मोखाडा शहरातील पिंपळाचा पाडा येथील 8 वर्षीय बालिका तेथीलच आपल्या मैत्रिणीच्या वाढदिवसाला गेली होती. मात्र उशिरापर्यंत ती घरी परतलीच नाही. त्यामुळे तिच्या पालक व नातेकाईकांनी शोधाशोध केली असता रात्री उशिरा कब्रस्ताननजीक सापडली होती. मोखाडा ग्रामीण रुग्णालयात तिला तपासणीसाठी नेले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱयांनी तिला मृत घोषित केले होते. या बालिकेवर अत्याचार करून नराधमाने तिला ठार मारले होते. या घटनेमुळे नागरिक संतप्त झाले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;