Navi Mumbai News – गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Navi Mumbai News – गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

नवी मुंबईतील उलवेमध्ये असलेल्या जावळे गावात गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन आई आणि तिच्या दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. एकीकडे दिवाळीचा उत्साह देशभरात पहायला मिळत आहे. मात्र, जावळे गावात घडलेल्या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घरातील 5 किलोच्या दोन सिलेंडरचा भयंकर स्फोट झाल्याने ही ह्रदयद्रावक घटना घडली. या भयंकर स्फोटात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा रुग्णालयात घेऊन जात असताना मृत्यू झाला. मृतांमध्ये आई, 15 वर्षांची मुलगी आणि 8 वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या, काही वेळाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. कुटुंबातील एक व्यक्ती गंभीर जखमी असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्फोटाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;