Maharashtra Assembly Election 2024 – दापोलीत रासपला धक्का, उमेदवाराचे नामनिर्देशन पत्र अवैध

Maharashtra Assembly Election 2024 – दापोलीत रासपला धक्का, उमेदवाराचे नामनिर्देशन पत्र अवैध

दापोली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाला मोठा धक्का बसला असून अनंद पांडूरंग जांधव यांचे नामनिर्देशन पत्र अवैध ठरवण्यात आले आहे. त्यामुळे आता दापोली विधानसभा मतदारसंघात उमेदवारांची संख्या 11 वरून 10 झाली आहे. 4 नोव्हेंबर ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे 4 तारखेपर्यंत कोण कोण विधानसभेच्या रिंगणातून बाहेर पडणार याची प्रतिक्षा दापोली मतदारसंघातील मतदारांना लागली आहे.

महाराष्ट्र राज्याच्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीतील दापोली विधानसभा मतदारसंघात उमेदवारांनी दाखल केलेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी दापोली उपविभागीय अधिकारी कार्यालयात दापोली विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा दापोली तहसीलदार अर्चना बोंबे (घोलप) यांच्या उपस्थितीत सकाळी 11 वाजता करण्यात आली. यावेळी उमेदवारांनी प्राधिकृत केलेले त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 11 उमेदवारांच्या 14 प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात आली. यामध्ये अनंत पांडुरंग जाधव यांनी राष्ट्रीय समाज पक्षातर्फे दाखल केलेल्या नामनिर्देशन पत्रात आवश्यक असलेल्या 10 सुचकांची नावे नसल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचे नामनिर्देशन पत्र अवैध ठरविले. त्यामुळे आता दापोली विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या एकुण 10 उमेदवारांचे 13 नामनिर्देशन पत्र वैध ठरले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;